शारदा विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल पेडली शाळेस सन 2005 च्या दहावी बॅच यांसकडून फॅन व साऊंड सिस्टीम साहित्य भेट, शारदा विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल पेडली येथे 2005 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा संपन्न
सुधागड प्रतिनिधी/प्रशांत हिंगणे
सुधागड तालुक्यातील शारदा विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल पेडली शाळेस सन 2005 च्या दहावी (अ व ब तुकडी) बॅच यांसकडून रविवार ता. 27 ऑगस्ट रोजी फॅन व साऊंड सिस्टीम साहित्य भेट देण्यात आले. या स्नेहमेळावा कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजेश गोळे सर यांच्या शुभहस्ते सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जागृती शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी मुख्याध्यपक जे.बी.गोळे सर यांची निवड मुख्याध्यापक कृष्णा हेमाडे सरांच्या अनुमोदनाने करण्यात आली. यानंतर सर्व उपस्थित शिक्षक वर्गाचे गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
यावेळी शारदा विद्यामंदिर हायस्कूल पेडलीचे मुख्याध्यापक कृष्णा हेमाडे सर, शिक्षक प्रदीप गोळे सर, हिरामण तांडेल सर,पांडुरंग आवतडे सर, जे. डी. म्हात्रे सर, पी.बी.पाटील सर,सुमन शिंदे मॅडम, मनीषा भिलारे मॅडम, अनिता साबळे मॅडम, वैशाली शिरसाट मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक विश्वास निकम सर, शशिकांत पारखे सर तसेच शाळेचे शिपाई कर्मचारी वर्ग गजानन हिंगणे, विठ्ठल डोके, कृष्णा मैराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहमेळावा कार्यक्रमाच्या वेळी निलेश नंदकुमार देशमुख, शिवासिंग राजपूत, रामसिंग राजपूत मनोज सुर्वे, रुपेश चव्हाण, दिपाली रोकडे, पल्लवी देशमुख या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. नथू चोरघे याने शिवाजी महाराज अतिशय सुंदर पोवाडा सादर केला. तसेच राजेश गोळे सर, पांडुरंग अवताडे सर, विश्वास निकम सर, मनीषा भिलारे मॅडम यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा देत मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.बी.गोळे सर यांनी आपले विचार मांडले. त्यांनी आपल्या भाषणातून तुम्ही सर्व माजी विद्यार्थी स्नेहमेळावासाठी येथे आलात यामुळे मला प्रेरणा मिळत आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी निलेश देशमुख याने इंग्लिश शिकविण्यात सगळीकडे नाव कमवले आहे. आज आपल्या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर, MBA, कॉम्प्युटर इंजिनियर अशा वेगवेगळ्या चांगल्या पदावर काम करीत आहेत. काही तर परदेशात सुद्धा गेले आहेत. शाळेवर शिक्षक निवडताना मी सर्व विषयाचे उत्तम शिक्षक निवडले आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. आज मी चांगले शिक्षक निवडल्यामुळे आज तुम्ही प्रत्येक जण चांगल्या प्रकारे जीवन जगत, यशस्वी झाला आहात.
यावेळी शारदा विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल पेडलीचे सन 2005 च्या दहावी (अ व ब तुकडी) बॅचचे विद्यार्थी सोनल देशमुख, नीलम मानकर, सुप्रिया मानकर, अंजना जाधव, सुमिता देशमुख, दिपाली रोकडे, किशोरी साळवी, प्रगती पोरे, पल्लवी देशमुख, नथुराम चोरघे, अभिजीत चव्हाण, दयावान चोरघे, महेंद्र चोरघे, दिनेश देशमुख, निलेश नंदकुमार देशमुख, निलेश दिलीप देशमुख, महेश देशमुख, सुशांत झुंजारराव, रुपेश देशमुख, रुपेश चव्हाण, मनोज सुर्वे, हनुमंत रांगोले, राम तुपे, रामसिंग राजपूत, शिवसिंग राजपूत, वीरेंद्र जैसवाल, राहुल जाधव, संतोष माने, निलेश जाधव, नितीन चव्हाण, दिलीप राठोड, अनंता बेलोसे, दुर्गेश वारगुडे, रमेश देशमुख, विजय शेडगे, प्रशांत हिंगणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शनाचे कार्य उत्तमरित्या हिरामण तांडेल सर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत