रा.जि.प. शाळा परळी येथे बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न.
आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
परळी - रायगड जिल्हा परिषद शाळा परळी येथे विध्यार्थ्यांचा बालआनंद मेळावा मा. केंद्र प्रमुख हाके साहेब यांचा मार्गदर्शना खाली उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेत विध्यार्थ्यांनी आपलें आपले स्टॉल मांडले. या मध्ये, गुलाब जामून, भेळ, वडापाव, कच्च्या कैऱ्या, भाजीपाला, कलिंगड, शरबत असे वेगवेगळे खाऊंचे स्टॉल ठेवण्यात आले. त्यांची खरेदी करण्या साठी विध्यार्थी सुद्धा उत्साही होताना दिसलें. त्याच बरोबर पालक वर्ग सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झालेला दिसून आला. केंद्र शाळा असल्या कारणाने केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी आवर्जून या बालआनंद मेळाव्याला हजेरी लावून चिमुकल्यांनी आणलेल्या वस्तूंची खरेदी केली. आणि विदयार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यापार , रोजगार ,गणिती व्यवहार यांची संकल्पना दृढ व्हावी आणि भविष्यातील विद्यार्थ्यांमध्ये लपलेले व्यवसाय गुण दिसावे हा महत्त्वाचा उद्देश होता. असे केंद्रप्रमुख यांनी आपल्या मनोगतातून संदेश दिला. सदर कार्यक्रम मा. केंद्रप्रमुख श्री. हाके सर यांचा मार्गदर्शना खाली झाला असुन विद्यार्थी , पालक , शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुहास भुसे सर, तसेच शाळेतील हरहुन्नरी शिक्षक श्री. शहानवाज शेख सर तसेच श्रीमती विद्या शिंदे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या करीता अपार मेहनत घेतली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत