HEADLINE

Breaking News

पेण / पाटनोली येथे "मेरी मिट्टी, मेरा देश" अभियानांतर्गत "शिलाफलक अनावरण आणि वृक्ष लागवड" कार्यक्रम संपन्न.

 


दिनांक: १३-०८-२०२३ 

पेण / पाटनोली : (संजय गायकवाड) दि. १३ :  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत  आहे.

येत्या ९ ते २० ऑगस्टदरम्यान ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रात घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

पेण तालुक्यातील ग्रामपंचायत पाटनोली येथे "मेरी मिट्टी, मेरा देश" अभियाना अंतर्गत "शिलाफलकाचे अनावरण आणि वृक्ष लागवड"  कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच नर्मदा प्रकाश वाघमारे, उपसरपंच विकास मुरलीधर पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य मानसी पाटील, विक्रांत पाटील, हरतालिका पाटील, संगीता पवार, जनाबाई भोईर, चंद्रकांत वाघमारे, ग्रामसेवक कृष्ण पाटील, संजय म्हात्रे, नरेश पाटील, दिनेश म्हात्रे, दिलीप म्हात्रे, संजय पाटील, दत्ता म्हात्रे व सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत