HEADLINE

Breaking News

दिवंगत मुक्ताबाई जानू भोईर यांच्या स्मरणार्थ छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी शैक्षणिक साहित्याचे वाटप

 


| कर्जत | | वार्ताहर |

कर्जत : (वार्ताहर) : दि. १५ ऑगस्ट : देशभरात ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या गर्वात आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. कर्जत येथील टेंभरे प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमंत जाणू भोईर यांच्या मातोश्री दिवंगत मुक्ताबाई जानू भोईर यांच्या स्मरणार्थ आणि छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून प्राथमिक शाळा टेंभरे कर्जत येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यात वही, पेन यांचा समावेश होता. तसेच यावेळी स्वातंत्र्योत्सव साजरा करताना शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष नरेश देशमुख, रायगड जिल्हा सचिव दीपक संसारे, रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमंत भोईर, रायगड जिल्हा खजिनदार संजय पवार, रायगड जिल्हा सल्लागार दिलीप साळवी, खालापूर तालुका अध्यक्ष भानुदास जांभळे, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक साहेब, पेण तालुका अध्यक्ष निलेश जाधव, पनवेल पूर्ण कोन विभाग अध्यक्ष अनंत कोंडुलकर साहेब, आणि सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून कर्जत प्राथमिक शाळा टेंबरे येथे हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत