औद्योगिक प्रशिक्षण संस्था खालापूर येथे पीएम रन फॉर स्किल कार्यक्रमा सह दीक्षांत समारंभाचे आयोजन
|साजगाव| |राजेश गायकवाड|
खालापूर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था खालापूर येथे रन फॉर स्किल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि सदर स्पर्धा विना अडथळा पार पाडण्यात आली.
तसेच या कार्यक्रमात मागील शैक्षणिक सत्रातील आयटीआय मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले गेले होते. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक माननीय श्री अमोलजी जाधव तसेच त्यांच्या पत्नी रुपाली जाधव यांनी प्रमुख पाहूने कार्यक्रमास हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर संस्थेचे प्राचार्य माननीय श्री बारगळ साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर दीक्षांत समारंभात आलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व गुणपत्रिका देऊन सन्मानित केले तसेच रन फॉर स्किल्स वरती अंतर्गत प्रथम आलेले द्वितीय आलेले विद्यार्थी यांना रोख रक्कम तसेच पारितोषिक वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड्रेस मेकिंग च्या शिल्प निदेशक सौ रेखा सगळे मॅडम यांनी केले तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरता संस्थेतील श्री पाटील सर हजर होते यावेळी उपस्थित माजी नगरसेवक श्री अमोल जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यांसारखे कार्यक्रम दरवर्षी राबवले गेले पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण शारीरिक विकास झाला पाहिजे.
यानंतर अल्पहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य श्री बारगळ साहेब श्री पाटील सर, रेखा सगळे मॅडम, ठाकूर मॅडम, सावंत मॅडम यांच्याबरोबर सर्व स्टाफ शिपाई आणि विद्यार्थी हजर होते, सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला याबद्दल प्राचार्यांनी सर्वांचे आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत