HEADLINE

Breaking News

पालीत रस्त्यावर पडले मोठे भगदाड रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हअवजड वाहतुकीचा फटका. अमित गवळे वृत्तसेवा पाली, ता. 11 (वार्ताहर) राम आळी येथील राम मंदिरा जवळील रस्त्याला भगदाड पडले आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक वाहने या खड्ड्यात अडकली आहेत. तसेच पादचारी व वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे. तसेच रस्ता चुकवताना अपघाताचा धोका आहे.


पालीत रस्त्यावर पडले मोठे भगदाड 
रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
अवजड वाहतुकीचा फटका 

अमित गवळे सकाळ वृत्तसेवा 
पाली, ता. 11 (वार्ताहर) राम आळी येथील राम मंदिरा जवळील रस्त्याला भगदाड पडले आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक वाहने या खड्ड्यात अडकली आहेत. तसेच पादचारी व वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे. तसेच रस्ता चुकवताना अपघाताचा धोका आहे. 
    अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील काही रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत. या मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले होते. परिणामी काही ठिकाणी लोकांच्या विरोधामुळे मोऱ्यांचे नव्याने दर्जेदार काम केले आहे. मात्र काही ठिकाणी या मोऱ्या व रस्ता तसाच आहे. परिणामी अवजड वाहने जाऊन रस्ते खराब होत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे पाणी साचते. त्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने त्वरीत लक्ष देउन रस्त्यावरील खड्डे बुजवावे, तसेच नव्याने झालेल्या रस्त्याचा दर्जा तपासावा आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे
  
चौकट  
अवजड वाहने 
    पाली शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जाते. डबर, माती व खडी वाहून नेणारे डंपर हे अधिक प्रमाणात असतात. परिणामी अतिरिक्त भार आल्यामुळे रस्ते खराब होतात, व रस्त्यांना खड्डे पडतात तसेच मोऱ्या देखील खचतात.

कोट 1
    येथील खड्डा भरण्याचे व रस्ता सुस्थितीत करण्याचे काम लागलीच करण्यात येईल. पाली शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीवर निर्बंध आणले पाहिजेत. तसेच प्रलंबित बाह्यवळण मार्गाचे काम संबंधित विभागाने लवकर पूर्ण करावे जेणेकरून पालीतून अवजड वाहतूक होणार नाही. 
प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली 
कोट 2
 मागील काही दिवसांपासून या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये अनेक वाहने अडकली आहेत. तसेच पावसाचे पाणी भरल्यामुळे खड्डा दिसत नाही. रात्रीच्यावेळी देखील वाहनचालक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. लवकर हा खड्डा भरून रस्ता सुस्थितीत करावा. 
सागर घाग, स्थानिक तरुण 
फोटो ओळ, पाली, येथील राम मंदिराजवळ रस्त्याला पडलेला मोठा खड्डा . (छायाचित्र, अमित गवळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत