चालू एसटी बसचा एक्सेल तुटला प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
अमित गवळे
पाली, ता. 6 (वार्ताहर) पालीहून पाच्छापूरला जात असणार्या एसटी बसचा एक्सेल बाहेर निघाले, सुदैवाने चाक निखळले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. प्रवाशांच्या च्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. परिवहन महामंडळाच्या या गलथान कारभाराबद्दल प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी (ता.5) सकाळी साडेआठच्या दरम्यान पालीहून पाच्छापूरला जाणार्या दर्यागाव एसटी बसचा पाच्छापूर फाट्यावर अचानक आवाज येऊ लागला. काही प्रवाशांनी हा आवाज ऐकला व वाहकाला एसटी थांबविण्यास सांगितले. त्यानुसार चालकाने त्वरित एसटी बस थांबवली व गाडीतून खाली उतरून पाहिले तर बसच्या मागच्या बाजूच्या चाकातला एक्सेल बाहेर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाशांच्या प्रसंगवधानाने मोठा अपघात होण्यापासून टळले. वेळीच प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली नसती तर बसच्या चाकातून एक्सेल बाहेर येऊन एसटी कोसळून मोठा अपघात झाला असता.
पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गावापर्यंतचा रस्ता हा घाटातील असून याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरचे डांबर जाऊन रस्त्यावर खड्डे पडून मोठी दगडे रस्त्यावर आली आहेत. एसटी बसमध्ये बसलेल्या अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असत्या. त्यामुळे अशा लांबच्या प्रवासाला जात असताना चालकाने व वाहकाने वाहनाची योग्य ती पाहणी करणे गरजेचे होते. या निष्काळजीपणामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
फोटो ओळ, पाली, एक्सल तुटलेली बस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत