HEADLINE

Breaking News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) चा वाढता प्रभाव; अनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) चा वाढता प्रभाव; अनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश


खालापूर/प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या अभ्यासू व दूरदृष्टी असलेल्या प्रभावी नेतृत्वावर आणि कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) या पक्षात प्रवेश करीत असल्याने हा पक्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि सामाजिक नेते देखील या पक्षात सामील होत आहेत. खालापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस पंकज मंगेश केदारी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना कुंभीवली विभाग अध्यक्षपदी नियुक्त करून त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेतली आहे. याचबरोबर, कुंभीवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नरेश मणेर यांनीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) मध्ये प्रवेश करत खालापूर तालुक्याचे कार्याध्यक्ष पद स्वीकारले आहे. त्यांच्या या निवडीने स्थानिक राजकारणात नव्या उर्जेचा संचार झाल्याचे मानले जात आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक गोतारने, सचिव राकेश गायकवाड, उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, खालापूर तालुकाध्यक्ष सुनील सोनावणे, उपाध्यक्ष दीपक गायकवाड, सचिव गणेश केदारी आणि प्रवक्ता संतोष केदारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या नवीन प्रवेशांमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (1956) चा आधार वाढत असून, आगामी काळात पक्षाचे स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणात महत्वाचे स्थान असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

     

  "येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वातील तरुणाईचा चेहरा म्हणून डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्याकडे पाहत असून मागील लोकसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते योग्य नेतृत्व नसल्यामुळे विविध पक्षात गेले होते. तेच कार्यकर्ते आता पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात घर वापसी करीत आहेत. येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आंबेडकरी चळवळीच्या गट तट नसलेल्या रिपब्लिकन पक्षात (१९५६) आंबेडकरी जनता काम करणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६) हा एकमेव पक्षच राहणार आहे."

          गोपीनाथ सोनावणे - उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(१९५६), रायगड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत