HEADLINE

Breaking News

आज भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यापेक्षा मानवतेचा राष्ट्र बनवणे जास्त गरजेचं आणि महत्वाचे आहे!






इतिहासातून प्रेरणा मिळते आणि हीच आमची अस्सल संपत्ती आहे. आमचे महापुरुष, संत, महात्मे, आमच्या माता भगिनी यांच्या त्यागातून आणि संम्यक विचारातून आम्हास जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आम्ही भाकडं कथेतून मांडलेल्या कोणालाही आमचा गुरु किंवा आमचा प्रेरणास्थान मानलेला नाही. महाराष्ट्र ही भूमी आहे संतांची, महापुरुषांची आणि त्यांच्या त्यागाची. याभूमीत अगणित विचारवंत ही निर्माण झाले. उगाच आम्ही काहीही बोलत नाही जर एकीनं नसेल तर इतिहासात जाऊन बघा, वाचा आणि बोलण्यापूर्वी विचार करा.

आपण काय बोलतो, कोठे बोलतो याचे भान असायला हवे. स्वतःला बाबा किंवा स्वामी म्हणून घेणारे तुम्ही देवाच्या नावाने पैसे कामावणारे तुम्ही. देवाच्या नावाने अगणित संपत्ती कमविणारे तुम्ही. समजता काय स्वतःला! हे आत्ता तर स्वतःला देवाचं समजू लागलेत.

महाराष्ट्रातील संतांनी मनुष्याला माणूस बनवण्यासाठी आपले शरीर झिझवलं, होतं न्हवतं तेवढ समाजात वाटून ते खाली हात राहिले. अमाप नेक विचाराचा ठेवा आम्हाला दिला. मानवतेचा धडा शिकवला. कोणीपण उठतो आणि आमच्या संतांवर, महापुरुषांनवर, आमच्या माता भगिनीवर बोलतो. काय अधिकार तुमचा?? तुम्ही बोलाना तुमच्याचं लोकांवर. देवावर बोला, देवींवर बोला कोणी रोकलाय तुम्हाला. तुमच्या भाविकांवर बोला, तुमच्या इस्टेटीवर बोला. पण आमच्या वर बोलू नका. एवढे उपकार करा कारण तुम्ही आमच्या महापुरुषांनवर बोलणं म्हणजे तुमच्या आकलन शक्तीच्या पतिकडचं आहे. आमच्या संतांवर बोलण्यासाठी आमच्या कडे आहेत आमचा वारकरी संप्रदाय आहे, कर्तनकारी मंडळ आहे, अभ्यासक आहेत, लेखक आहेत तुम्हाला कोणी पान सुपारी दिली आहे का?

आज एक बगाड बुवा म्हणे की "संत तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारे म्हणून ते राम राम करीत होते." जणू हा तेव्हा जिवंत होता याने ते पहिले होते. आरे बघड्या ते काय बोलायचे तेच तुला नाही. अन उगाच काहीही बोलून जातो.

आज महाराष्ट्रात संत, महात्मे, महापुरुष, माता, भगिनी जिवंत आहे ते त्यांच्या कर्मांनी आणि त्याच्या विचारांनी.
आत्ता कोणी राजकारणी बोलणार नाही कारण हिंदू राष्ट्र बनवणार अशी गोळी दिलीये यांनी पण याद राखा जेव्हा महाराष्ट्र लोकांच्या सहनशक्तीचा बांद फुटेल तेव्हा तुमचा नाश करण्याची ताकत ही पैदा होईल. आम्ही शांत आहोत ते यांच्या संत महात्माच्या दिलेल्या संस्कारांनी. आम्ही दुर्बल नाही आहोत यकीन नसेल तर आमचा इतिहास चालून बघा.
"आज भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यापेक्षा मानवतेचा राष्ट्र बनवणे जास्त गरजेचं आणि महत्वाचे आहे!"


- यशवंत द. ओव्हाळ

- यशवंत द. ओव्हाळ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत