मुंबई गोवा महामार्गावर आणखी एक अपघात सुदैवाने जीवितहानी नाही
पाली - ( प्रशांत गायकवाड) गोवा महामार्गावरील वाकण ते चिकनी दरम्यान एका तीन चाकी टेम्पो चा खड्ड्यात आदळल्याने अपघात झाला आहे. हा अपघात २८ जुलै रोजी दुपारी सुमारे ०१ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अपघात ग्रस्तांना सहकार्य केले. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लवकरच या रस्त्याची डागडुजी न झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो असे येथील प्रवाश्यांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत