HEADLINE

Breaking News

खोपोलीत महाराष्ट्र अंनिस च्या वतीने मणिपूर हिंसा - अत्याचार प्रकरणी निषेध निदर्शने


खोपोली: मणिपुरातील मागील काही महिन्यांपासन सातत्याने हिंसा जाळपोळ लुटीचे सत्र सुरू आहे. महिला अत्याचाराच्या भयंकर घटनेने या प्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधले गेले. मणिपूरमध्ये स्त्रियांशी झालेल्या अत्यंत अभद्र व क्रूर वर्तनाचा आणि त्याबाबत निष्क्रीय राहणार्‍या शासनाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखे तर्फे तीव्र निषेध व्यक्त करणार्‍यात आला.

          पाऊस असला किंवा नसला तरी समाजावरील काळ्या ढगांचे सावट प्रतिकात्मकरित्या दर्शविण्यासाठी काळी छत्री डोक्यावर धरून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात महाराष्ट्र अंनिस च्या वतीने करण्यात आले होते.

         या निषेध निदर्शनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती माझी रायगड जिल्हाध्यक्ष यशवंत गायकवाड, खोपोली शाखा अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौंड, शाखा प्रधनसाचिव योगेश वाळगुडे, वै.जा. प्र. विभाग कार्यवाह सुनील जगताप, विविध उपक्रम विभाग कार्यवाह दयानंद पोळ, मंगेश निकाळजे, रिचर्ड जॉन,सागर जाधव,रेखा ताई जाधव,मेराज खान,अस्मिता सालुंखे,ममता पांडे,पुजारी मैडम,उस्मान शेख,जिलानी शेख,संदेश धावारे,जाधव सर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  "आपण या अत्याचार व हिंसाचाराच्या विरोधात व्यक्त होण्यासाठी रस्त्यावर या. हा वणवा वेळेत थांबवला नाही तर आपल्याही अंगणाला वेढल्याशिवाय राहणार नाही." 
---
महाराष्ट्र अंनिस खोपोली शाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत