पातालगंगा एमआयडीसी मध्ये शर्मा वेअर हाऊस कंपनीला भीषण आग.
| पाली || प्रशांत गायकवाड |
पाली: (प्रशांत गायकवाड): दि. 18: पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये शर्मा वेअरहाऊस कंपनीच्या गोदामाला संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील 12 अग्निशमन दलाच्या गाड्या जवानांसहित दाखल झाल्या आहेत.आग विझवीण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. ही कंपनी रसायनी मधील पातलगंगा वसाहती मधील कैरे गावा जवळील रिलायन्स आणि इतर कंपनींना लाकडी व प्लास्टिकचे प्लॅनेट तयार करून देत असते संध्याकाळची वेळ असल्यामुळे कामगार घरी गेले होते, त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत