HEADLINE

Breaking News

आदिवासी प्रतिष्ठान ट्रस्ट व सिनर्जी फुड्स लिमिटेड (Mr iDLi) च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.


| पेडली || आनंद जाधव |

आदिवासी प्रतिष्ठान ट्रस्ट व सिनर्जी फुड्स लिमिटेड (Mr iDLi) च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.


आसरे / पेडली (आनंद जाधव) : आदिवासी समाजाचा विकास व्हावा या हेतूने कार्य करणारे तरुण तडपदार नेतृत्व हुशार सामान्य जनतेची जाण असलेले आदिवासी प्रतिष्ठान ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष सचिन सागळे व सिनर्जी फुड्स च्या वतीने दि. १९ ऑगस्ट रोजी रा.जी.प. शाळा मुळशी आदिवासी वाडी व रा.जि.प. शाळा वांद्रोशी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. समाजाचा विकास व्हायचा असेल तर शिक्षण गरजेचे असते. शिक्षण घेत असताना मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिनर्जी फूड्स लिमिटेड चे अमित सतविडकर,पंकज पवार आणि टीम तसेच आदिवासी प्रतिष्ठान ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष सचिन शंकर सागळे, आदिवासी प्रतिष्ठान ट्रस्ट च्या कार्यकर्त्या रुचिता पाटील, सुप्रिया सागळे, शुभांगी सागळे, अध्यक्ष तुषार शेडगे, रमेश वाघमारे, सचिव महादू चव्हाण, शंकर सागळे, देवराम जाधव, सदस्य दिनेश जाधव, भावेश बेलोसे, राजू शेडगे, महेश अधिकारी, श्रेयश जाधव, शेखर चव्हाण, मुळशी शाळेच्या शिक्षिका कविता बोटे, ग्रामस्थ देऊ घोघरकर, वांद्रोशी शाळेच्या शिक्षिका अर्चना ठाकरे, निशा ठाकूर, नरेश शेडगे सर,शाळा समिती अध्यक्ष संजय शेडगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत