HEADLINE

Breaking News

खुरावले फाटा ते वाघोशी रस्ता झालाच पाहिजे. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड स्वातंत्र्यदिनी करणार उपोषण.

स्वातंत्र्यदिनी उपोषणावरती ठाम. खुरावले फाटा ते वाघोशी रस्ता झालाच पाहिजे.- नरेश गायकवाड

पाली/ वाघोशी : (अमित गायकवाड) : खुरावले फाटा ते भैरव - वाघोशी - कुंभारघर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शासनाने ०२ कोटी 80 लाख खर्च करून हा रस्ता बांधला होता. मात्र रस्ता बनवल्यापासून काही कालावधीतच हा रस्ता खड्डेमय झाला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदाराने या रस्त्यावर केलेले आहे. त्यामुळे हा कंत्राटदारच बदलावा अशी मागणी होत आहे. हा मार्ग  रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती आहे.

या रस्त्याची डागडुजी व्हावी याकरिता ऑल इंडिया पॅंथर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी अनेक आंदोलन निवेदन शासन दरबारी केली. मात्र शासनाने प्रत्येक आंदोलनाला केराची टोपली दाखवल्यामुळे नरेश गायकवाड हे येत्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी खुरावले फाटा येथे शासनाच्या विरोधात आमरण उपोषणास बसणार आहेत. "या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा. निष्क्रिय असलेल्या कॉन्ट्रॅक्टर बदलावा अन्यथा आपण आमरण उपोषण करण्यावर ठाम आहोत" असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड यांनी म्हंटले आहे.  यावेळी शासनाकडून चर्चा करायला आलेले शासकीय अधिकारी गोरे यांनी रस्ता पुन्हा दुरुस्त करू असे आश्वासन दिले आणि  तसे पत्र देऊ असे सांगितले मात्र या उत्तराने माझे समाधान झालेले नाही. जोपर्यंत काही ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे देखील त्यांनी सांगितले.  वाघोशी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सदस्य उत्तम देशमुख व दीपक पवार यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला असून पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत