जागतिक आदिवासी दिवस आडोशी जगमवाडी व कुंभेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा.
या वेळी उपस्थित मान्यवर दिनेश कातकरी साहेब यांनी जागतिक आदिवासी दिवस व त्याचे महत्व पटवून सांगितले. तसेच शिक्षण, बेरोजगारी, दारू तंबाखू यांसारखे व्यसनामुळे आदिवासी समाज अजूनही जशी हवी तशी प्रगती झालेली नाही. असे त्यांनी आपले मत मांडले. तसेच वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण लक्ष्मण भालेराव व तालुका युवा अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी स्थानीक विकास कामे व मुलांचे शिक्षण आणि आपण निवडणुकीचा वेळी जागरूक राहून योग्य उमेदवार निवडला पाहिजे या वर महत्वाचे विचार मांडले. तसेच हरी वाघमारे यांनी ही मुलांच्या शिक्षणावर व तरुण मुलांनी कोणत्याही राजकीय पुढारी याचा पाठी न जाता आपला विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केल पाहिजे असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सुधागड - पाळी या तालुका मधून युवक जास्तीचा संख्येने उपस्तिथ राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या वेळी जगमवाडी मधील आयोजकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजिक कार्यकर्ते रोहनजी मोरे यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे आयोजन भीमा देहू वाघमारे -(बिरसा ब्रिगेड संघटना आडोशी जगमवाडी गावप्रमुख), रघुनाथ नथू वाघमारे -(बिरसा ब्रिग्रेड संघटना उप-गावप्रमुख), गोरखनाथ किसन वाघमारे-( बिरसा ब्रिग्रेड संघटना गाव सचिव), रमेश लक्ष्मण वाघमारे साहेब-( श्रमजीवी संघटना महासचिव),रवी बाळू वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड संघटना साजगांव पंचक्रोशी संघटक), हरी नवशा वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड कुंभेवाडी गाव प्रमुख), सुनील बाळू वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड कुंभेवाडी उप गावप्रमुख ), राणी अनिल वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड सदस्या), संगीता शांताराम वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड सदस्या), अनुसया नवशा वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड सदस्या), मंगल हरी वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड सदस्या), राहीबाई गणू वाघमारे-(बिरसा ब्रिग्रेड सदस्या),पांडू वाघमारे,व युवा तरुण महिला वर्ग,जेस्ट नागरिक यांनी सर्वांनी मिळून हा आजच जागतिक आदिवासी दिवस आडोशी जगमवाडी व आत्करगाव कुंभेवाडी यांनी मिळून अतिशय आनंदात साजरा केला.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत