पडसरे आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनमोठ्या उत्साहात साजरा.
![]() |
पडसरे आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनमोठ्या उत्साहात साजरा. |
पाली, (निशांत पवार) दि.९ ऑगस्ट ला अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे येथे मा. प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव व कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रविंद्रजी लिमये यांच्या मार्गदर्शनाने जागतिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला, वैविध्यपूर्ण नृत्य, वक्तृत्वातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. सदर च्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाला कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली या संस्थेच्या वावळोली आश्रमशाळेत शिकलेले घोडगाव (सुधागड) चे सुपुत्र व विद्यमान सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.सादूराम बांगारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थांच्या विविध कलागुणांचे कौतुक करून आश्रमशाळेत शिक्षण घेऊन मेहनत केलीत तर मेहनतीचे फळ निश्चित मिळते असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून केले. त्या प्रसंगी पडसरे ग्रामस्थ, पालकवर्ग, माध्यमिक मुख्याध्यापक संदिप शिंदे , प्राथमिक मुख्याध्यापिका मिनाक्षी ढोपे, अधिक्षक श्री. माळी सर, स्त्री अधिक्षिका श्रीमती इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षिका सौ.गार्गी चोरगे, शिक्षक अनिल साजेकर , पदवीधर प्राथमिक शिक्षिका सौ. श्वेता जाधव , सौ.दिपाली घरट, श्री.क्षिरसागर सर सौ.भडवळकर मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माध्यमिक शिक्षक गणेश महाडिक यांनी केले.



जनतेची जत्रा
उत्तर द्याहटवाअन्यायाला वाचा फोडणारे वृत्तपत्र