सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
ठाणे (प्रतिनधी )- ठाण्यातील सुधागड तालुका वासियांच्या सेवेसेसाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा, ठाणे या संस्थेच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी मार्च 2023 साली दहावी-बारावी, पदवी व विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत शैक्षणिक आर्थिक मदत वितरण (पितृछत्र हरपलेला विद्यार्थी) आणि सत्कार समारंभाचे आयोजन रविवार दि.
13 ऑगस्ट 2023 रोजी सायकाळी 5.00 वा. सहयोग मंदिर घंटाळी, ठाणे येथे करण्यात येत आहे. तरी सुधागड तालुका आणि ठाणे शहरातील तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.
सुधागड तालुक्यातील ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या तालुकावासीयांच्या विकासासाठी झटणार्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवत्त विद्यार्थी मार्च 2023 साली दहावी, बारावी, पदवी व विशेष प्राविण्य यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी दत्तक योजनेअंतगत पितृछत्र हरपलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप तसेच इयत्ता 1 ली ते 9 वी विद्यार्थ्यासाठी बक्षिसे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ टाणे ग्रीन सीटीचे अध्यक्ष चंद्रशेखर श्रीधर लिमये व समाजसेवक, सुधागड मित्र सुरेश मधुकर मेश्राम हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शना करणार आहेत. तसेच यावेळी सुधागड जीवन गौरव, सुधागड आदर्श शेतकरी, सुधागड युवा उद्योजक, सुधागड मित्र आदी विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. सुधागड तालुका आणि ठाणे शहरातील तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत