HEADLINE

Breaking News

राष्ट्रपती शौर्य पदक विजेते CRPF जवान एन. आर. म्हात्रे यांच्याहस्ते वाशी येथे ध्वजारोहण.

   


राष्ट्रपती शौर्य पदक विजेते CRPF जवान एन. आर. म्हात्रे यांच्याहस्ते वाशी येथे ध्वजारोहण.

 वाशी/पेण (हेमंत पाटील)भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी 'शिवतेज युवा- फाउंडेशन रायगड' संस्थेच्या कार्यालयासमोर वाशी -पेण येथे देशाच्या सीमेवर 8 आतंकवाद्यांना कंठस्नान घालणारे कमांडो राष्ट्रपती शौर्य पदक विजेते CRPF जवान कोकण सुपुत्र श्री. एन. आर. म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांना राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिकरी वाशी गावचे सुपत्र व जनसेवा अँकँडमीचे प्रमुख श्री. विश्वनाथ पाटील सर यांच्या संचलनाने मानवंदना देण्यात आली.



यावेळी राष्ट्रध्वजाला व भारतीय जवान यांना मानवंदना देण्यासाठी ग्रा.पं. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, निवृत्त पोलिस अधिकारी, ए.टी.पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक, विद्यार्थी व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अतिशय नयनरम्य व शौरविराचां सोहळा साकारला अशा शब्दांत शिवतेज युवा फाउंडेशन रायगड संस्थेच्या कार्याचा कौतुक सर्वच स्तरांतून होत.



देशाचे सैनिक हेच खरे स्वजारोहणाचे मानकरी आहेत. तेच देशाचे खरे हिरो आहेत असे मत संस्थेचे अध्यक्ष हेमंत रंजन पाटील यांनी आपल्या भाषणांत व्यवत्त केले. ध्वजारोहणाचा सुरेख सोहदा अनुभवायला मिळाला अशा शब्दांत 'शिवतेज युवा फोउंडेशनच्या सदस्यांच्या कार्याचा कौतुक सर्वच स्तरांतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत