HEADLINE

Breaking News

पाचोऱ्यातील पत्रकावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ सुधागड तालुक्यातील पत्रकारांनी दिले निवेदन





|सुधागड-पाली| |गौसखान पठाण| 
१७ ऑगस्ट २०२३


पाली: पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचो-याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुधागड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी संघटीत होवुन तहसिल कार्यालयात तसेच पोलिस स्टेशनला घोषणा दिल्या व निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये सर्वच पत्रकार संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते. महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर झाले किंवा त्यांना धमक्या, शिविगाळ केली गेली. मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांच्या मनात उरली नाही. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटीलने शिविगाळ केली आणि दुस-या दिवशी आपल्या गुंडाकरवी त्याच्यावर हल्ला चढविला. मारहाण करणा-या गुंडावर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणा-या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवरील ७५ टक्के हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून होतात. अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी ऋएनसी' दाखल करून हा विषय बंद करून टाकतात असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत. हे थाबलं पाहिजे, आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याच कलम लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधीत अधिका- यावर कारवाई व्हावी, जेणे करून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल व पत्रकारांवरील हल्ल्याचे सर्व खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत या मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात हे आंदोलन होत आहे..

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. - पत्रकार रविंद्र ओव्हाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत