पेण प्रकल्पस्तरीय "मोस्ट ईनोव्हेटिव टिचर" म्हणून पडसरे आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. राजू मोरे यांची निवड.
पाली/ प्रतिनिधी - नुकताच झालेला ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षकदिना चे औचित्य साधून महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि.रायगड येथील शैक्षणिक गुणवत्ता कक्षा (ERC ) मार्फत प्रकल्पातील अनुदानीत आदिवासी आ यमशाळा पडसरे ता.सुधागड जि.रायगड या दुर्गम व डोंगराळदोन जिल्हय़ातील भागात काम करणारे तंत्रस्नेही व उपक्रमशील प्राथमिक शिक्षक श्री.राजू यशवंत मोरे सर यांनी २०२३ या शैक्षणिक वर्षापासून आपल्या आश्रमशाळेत राबविलेले नाविन्यपूर्ण असे उपक्रम आणि त्या आधी तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल शिक्षकदिनी त्यांचा "मोस्ट ईनोव्हेटिव टिचर " (नाविन्यपूर्ण उपक्रमशील शिक्षक ) म्हणून मा. प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव मॅडम यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र ,पुषगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
पेण प्रकल्पस्तरीय शासकीय १४ शासकीय व १० अनुदानित आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षकांना मागील वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC ) प्रकल्प पेण जि.रायगड यांच्या मार्फत विषय मित्र श्रीम. छाया प्रजापती मॅडम ,व श्रीम. पुर्णा पाटिल मॅडम व शिक्षण विस्तार अधिकारी सौ.ज्योती वाघ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेवाढी साठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रकल्पातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या आश्रमशाळेतील वर्गांमध्ये राबविलेल्या नाविन्यपूर्ण व विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी पुरक ठरतील अशा उपक्रमाची ऑनलाईन पद्धतीने परीक्षण करून व प्रत्यक्ष शाळा भेटी देऊन उपक्रमाची पडताळणी करून , आदिवासी विद्यार्थांच्या मध्ये झालेला शैक्षणिक बदलाची खात्री करून शिक्षकांना MOTIVATION देण्यासाठी प्रकल्पस्तराव प्रथम चार शिक्षकांनाची निवड करण्यात आली त्या मध्ये पहिले मानकरी ठरले आहेत. राजू यशवंत मोरे (पडसरे ता.सुधागड)
महादेव डोईफोडे (चिरनेर ता.उरण )
.सचिन मोरे (पिंगळस ता.कर्जत )
सौ.सुप्रिया पवार (वरवणे ता.पेण )
या प्रसंगी ERC विषय मित्र म्हणून श्रीम.पुर्णा पाटिल मॅडम यांनी या गुणवत्ता कक्षा मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची व शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती मा.प्रकल्प अधिकारी मॅडम यांना दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सतिश शेरमकर साहेब सहायक प्रकल्प अधिकारी पेण (शिक्षण विभाग ) यांनी केले तर
या प्रसंगी प्रकल्पस्तरीय आश्रमशाळेतील सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळांची मुख्याध्यापक, शासकीय वसतिगृहाचे अधिक्षक उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली या संसथेच्या अध्यक्ष सन्माननीय श्री.रविंद्रजी लिमये साहेब व पडसरे आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक संदिप शिंदे सर यांनी विशेष अभिनंदन केले असून संस्थेच्या माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सरीता सावंत मॅडम ,प्राथमिक मुख्याध्यापक मा.दिनेश इंगळे सर , तसेच चिवे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता पिंगळे मॅडम व प्राथमिक मुख्याध्यापक मा.श्री .जयवंत गुरव सर यानी व तिन्ही आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व जिल्हय़ातील सर्व मित्रपरीवारांनी राजू मोरे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत