HEADLINE

Breaking News

पाली येथील न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन





पाली/ अमित गायकवाड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन पाली तालुका विधी सेवा समिती यांच्यामार्फत पाली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात करण्यात आले आहे.

या लोकन्यायालयात पाली न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र खटले, दिवाणी दावे, वादपूर्व प्रकरणे, वित्तीय संस्था, बी.एस.एन.एल., ग्रामपंचायती, नगरपरिषद, बँका, वीज वितरण कंपनी यांच्याकडील वाट्पूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी संबधित सर्व नागरिकांनी आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवून निकाली काढली तर वेळेचा व पैशांचा होणारा अपव्यय टाळता येईल. याशिवाय, आपापसांतील वाद कायमस्वरूपी सामोपचाराने मिटून स्वस्त, सुलभ व जलद न्याय मिळेल. त्यामुळे सर्व पक्षकारांनी आपापली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी दि. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पाली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश तथा पाली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीमती मी. वा. जाधव यांनी केले आहे पाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत