प्राथमिक आरोग्य केंद्र जांभूळपाडा येथे आयुष्यमान भव आरोग्य सप्ताह शुभारंभ.
प्राथमिक आरोग्य केंद्र जांभूळपाडा येथे आयुष्यमान भव आरोग्य सप्ताह शुभारंभ.
परळी: दि. १४ : प्राथमिक आरोग्य अधिकारी जाभूळपाडा डॉ,वेदांती पाटील,, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असून शुभारंभ देखील करण्यात आला.आरोग्य सहाय्यक श्री, वामन मांगे यांनी आयुष्यमान भव आरोग्य सप्ताह विषयीं मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन डॉ, वेदांती पाटील यांनी केले असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात, क्षयरोग या विषयीं मार्गदर्शन केले असून, त्याच्यावर योग्य ते उपचार आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र जाभूळपाडा येथे करून रुग्णाना सेवा /उपचार देऊन बरे केले जाईल असे आश्वासित केले.क्षयरोग हा आजार बरा होणारा असून रुग्णानी घाबरून जावू नये असे यावेळी त्या आपल्या मार्गदर्शन भाषणात व्यक्त झाल्या. आयुष्यमान आरोग्य सप्ताह शुभारंभ प्रसंगी, जाभूलपाडा /परळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुष्यमान आरोग्य सप्ताह शुभारंभ प्रसंगी, जाभूलपाडा /परळी येथील ग्रामस्थ
यावेळी क्षयरोग मुक्त रुग्णाचा सन्मान करण्यात आला असून, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. T. B. चॅम्पियन म्हणून परळी धन्वन्तरी क्लीनिक चे असिस्टंट डॉ. दास यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांनी अनेक क्षयरोग रुग्णाना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन केले आणि उपचारानंतर हा आजार बरा होतो, असे आपल्या अनुभवातून ते बोलले. यावेळी आरोग्य सहाय्यक, श्री. वामन मांगे, आरोग्य सहायिका, सौं.एस एस सानप, आरोग्य सहायिका सौं. बी आर पिंगळे, आरोग्य सेवक श्री, के एस झेमसे, आरोग्यसेवक श्री.एस एस म्हात्रे, आरोग्यसेवक, श्री. एच एस तेलंगे, तसेंच आरोग्यसेविका सौं. एस पी दुर्गे, बी ए मांदळे, दीप्ती मोकल, तसेंच कनिष्ठ सहाय्यक,, श्री व्ही व्ही गुजर, जांभूळपाडा ग्राम विस्तार अधिकारी मा.बाळाजी केंद्रे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन, आरोग्य सहाय्यक मा. श्री, वामन मांगे यांनी केले असून कार्यक्रमा च्या शेवटी उपस्थिताना, अवयवदान याविषयीं मार्गदर्शन करण्यात आली, आणि अवयव दानाची प्रतिज्ञा देण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत