G-20 शिखर परिषदेच्या पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनात रायगडच्या महिलांचा सहभाग
अलिबाग, दि. १५ :- जी-व्टेंन्टी शिखर परिषद नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर 2023 रोजी पौष्टिक तृण धान्य प्रदर्शनामध्ये जगभरातील अनेक महत्वाच्या देशांच्या पंतप्रधान अथवा अध्यक्ष यांच्या पत्नीनी भेट दिले. याप्रसंगी त्यांचा सत्काराचा मान रायगड जिल्ह्यातील महिलांना मिळाला. यामध्ये साऊथ कोरिया पंतप्रधानांची पत्नी युन सिक व फ्रान्सचे प्रधानमंत्री मॅक्रॉन इमानुल यांच्या पत्नींचे सत्कार रायगड जिल्ह्यातील भारती कातकरी यांनी केले. यासह अनिता योगेश माळगे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या पत्नीं अक्षता ऋषी सुनुक, इटली प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचे स्वागत सत्कार केले.
या प्रदर्शनामध्ये देशभरातील अनेक राज्यातून तृण धान्य लागवड करणारे शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी, कृषि व संलग्न विषयाची विद्यापीठे व संस्था यांच्या लक्षणीय सहभाग होता. तसेच केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था, राष्ट्रीय दूध विकास संस्था -कर्नाटक , राष्ट्रीय पुष्प उत्पादन संस्था पुणे व भारतीय कृषि अनुसंधान संस्था दिल्ली. अशा राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या संस्था व त्यांनी संशोधन केलेल्या तंत्रज्ञान व संशोधनाची, कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा व हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा वेगवेगळ्या स्टॉलची मांडणी केली होती .
जी-व्टेंन्टी शिखर परिषद नवी दिल्ली येथे विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांसह पाचशे नामांकित व्यक्ती , उद्योगपती यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दोन महिलांना मिळाली. रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील नढाळवाडी गावच्या श्रीमती भारती दिलीप कातकरी यांनी विविध प्रकारच्या लाडवांचा स्टॉल लावला होता. यामध्ये नाचणी लाडू ,बेसन लाडू ,रवा लाडू अशा पौष्टीक लाडवांचा समावेश होता. याप्रसंगी साऊथ कोरिया पंतप्रधान यांची पत्नी युन सिक व फ्रान्सचे प्रधानमंत्री मॅक्रॉन इमानुल यांच्या पत्नींचे स्वागत सत्कारासाठी भारती कातकरी व अनिता योगेश माळगे यांची ब्रिटनचे पंतप्रधान यांच्या पत्नीं, इटली प्रधानमंत्री यांची निवड झाल्याने रायगड जिल्ह्याचे नाव जीटेन्टी मध्ये पाहेाचले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्यातून या महिलांना जी-व्टेंन्टी शिखर परिषदमध्ये निवड व सहभागी होण्यापर्यंत कृषी अपर मुख्य सचिव अनुप कुमार, आयुक्त कृषी सुनील चव्हाण, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रक विकास पाटील, संचालक आत्मा दशरथ तांभाले, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर दत्तात्रय गावसाने, आत्मा प्रकल्प अधिकारी सोलापूर मदन मुकणे, वरिष्ठ शास्त्रज्ञ सोलापूर लालासाहेब तांबडे, नाबार्ड सोलापूर नितीन शेळके, प्रज्ञा पाटील यांनी मार्गदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत