कंत्राटी शिक्षक भरती विरोधात रायगड जिल्हा आदिवासी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे नियोजन
| पेण | | संजय गायकवाड |
पेण दि. २४ : राज्यातील सुमारे ६२ हजार जिल्हा परिषद शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शासन निर्णय विरोधात तसेच कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करू नये, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता केवळ अध्यापनाचे काम द्यावे, या मागण्यांसह प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा आदिवासी संघटनेच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.
या संदर्भात आक्रोश मोर्चा नियोजन व मार्गदर्शन बैठक दिनांक २४ सप्टेंबर रोजी रानसई येथे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शासनाने काढलेल्या कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णया विरोधात दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. रायगड जिल्हाधिकारी यांना कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात येणार आहे. रायगड जिल्हा आदिवासी संघटना अध्यक्ष मालू निरगुडे यांनी यावेळी शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आदिवासी समाजाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या संदर्भात आवाहन केले. या मोर्चासाठी विविध आदिवासी संघटना तसेच एससी, एसटी, एनटी, आणि ओबीसी या सर्व संघटना उपस्थित राहणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने या मोर्च्याला जाहीर पाठींबा घोषित केला आहे. या नियोजन व मार्गदर्शन बैठकीस रायगड जिल्हा आदिवासी संघटना अध्यक्ष मालू निरगुडे, वंचित बहुजन युवा आघाडी पेण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, वंचित बहुजन युवा आघाडी पेण तालुका महासचीव प्रदीप गायकवाड हे उपस्थित होते..
.jpg)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत