अनाधिकृत जल वाहिन्या हटविण्याबाबत चांवडोली ग्रामस्थांचे कराडे ग्रामपंचायतीला निवेदन
| रसायनी | | वार्ताहर |
रसायनी: अनाधिकृत जल वाहिन्या हटविण्याबाबत चांवडोली ग्रामस्थांच्या वतीने ग्रुप ग्रामपंचयत कराडे खुर्द उपसरपंच मीनल ठोंबरे व ग्रामसेवक निवृत्ती अंधाले यांना तक्रारी निवेदन ग्रामपंचायत कार्यलयात देण्यात आले आहे. अनाधिकृत जल वाहिन्या जोडण्यामुळे चांवडोली गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रुप ग्राम पंचायत हद्दी मधील चांवडोली गावातील पाणीपुरवठ्याच्या जल वाहिन्यांवरून अनेकजण अनाधिकृत रित्या पाण्याची जोडणी करून घेत आहेत व त्याचा परिणाम चांवडोली ग्रामस्थ व महिला वर्गाला भोगावा लागत आहे. अशा अनधिकृत जोडण्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाचा काही दबाव राहणार आहे की नाही.?? हा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासन विना नोटीस पाणी बंद करून मनमानी करीत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनाधिकृत जल वाहिन्या त्वरित हटवाव्यात सदर तक्रारीचा गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने या निवेदना मार्फत करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रभाकर जाधव, रवींद्र सोनावळे, ऋतिक जाधव, मंगेश चितळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
.jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत