खोपोलीत राजकीय हिंदू सण साजरे होणार !
| रायगड | | वार्ताहर |
खोपोली : सध्या दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौ, दिपावली, दसरा ही प्रामुख्याने मोठ मोठी हिंदुची असणारे सण हे धार्मिक दृष्ट्या सण हे राहिलेच नाहीत. या हिंदुच्या सणांना राजकीय नेत्यांनी राजकीय कलर लावून एक प्रकारे भुरळ घालून गराडा घातल्याचेच दिसून येत असल्याने आता राजकीय हिंदू सण साजरे होणार असे वाटते. या वर्षी खोपोली शहरात गोपाळ काला दहिहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दर वर्षी होणाऱ्या दहिहंडीच्या संख्येत खोपोलीचे उद्योजक यशवंतशेठ साबळे यांची दहिहंडी झाली नसल्याने कमी झाली तर एक नव्याने भावी आमदार सुधाकरशेठ घारे यांची दहीहंडी झाल्याने एक दहिहंडीत वाढ झाली.
नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिकेच्या व त्या पाठोपाठ येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूका या पार्श्वभूमिवर या हिंदूच्या सणाचे केवळ निमित्त साधत शहरात राजकीय पक्षानी दहिहंडी लावून व अप्रत्यक्ष अन्य दहिहंडीना सहाय्य करून प्रत्यक्ष भेट देऊन प्रोत्साहित केले आणि संभाव्य गणपती सणालाही त्याच प्रकारे मदतीचा हात देवून व आपल्या छबीचा विशेषतः आकर्षकपणे डिजिटील बॅनर्सच्या माध्यमातून मतांची पेरणी करण्याच्या उद्देशाने हिंदूच्या या सणांतून सफल करित आहेत.
खोपोली शहरात प्रामुख्याने राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचे सुधाकर घारे व शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी मोठ्या रक्कमेचे बक्षिस लावून दहिहंडीच्या निमित्ताने अनेक गोविंदा पथकांना संधी प्राप्त करून दिली. मात्र या सणाचा भाजपा, शेकाप, काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आस्वाद घेता आला नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व आहे की नाही अशी चर्चा ऐकीवात येते आहे.
भावी आमदार राष्ट्रवादीचे सुधाकर घारे व विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आगामी निवडणूका डोळ्या समोर ठेवून भरगच्छ व खोपोलीकरांच्या स्मरणात राहिल असा दहिहंडीचा उत्सव साजरा केला तर अशा प्रकारे गणेश मंडळांना प्रोत्साहन देऊन मतदारांच्या नजरेत भरण्यासाठी जरूर प्रयत्न केलेत यामध्ये संदेह नाही. यासाठी गाव पातळीवर, शहर स्तरावर पक्षाचे धावपळ, पळापळ करणारे एकनिष्ठ कार्यकर्ते हे धडपड करणारच आणि भावी आमदार डिजिटल बॅनर कटाआऊटमध्ये दिसत रहाणार.
गणेश उत्सवासाठी गणेश मंडळांना डिजिटल बॅनरसाठी व कमानीसाठी बड्या राजकीय नेत्यांकडून आणि भावी मंडळीकडून अर्थिक सहाय्य मिळेलच शिवाय गणेश आरतीचा मान हा वेगळाच भावनिक धार्मिक श्रध्देचा भाग हा आलाच असो गणपती बाप्पा भाविकांना तसेच उत्सव साजरे करणाऱ्यांना सुबुध्दी दे अशीच या निमित्ताने प्रार्थना !.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत