कलाकाराला जात नसते, कलाकार हा समाजाचा आरसा असतो त्याने निर्मळ भावनेने समाजाचे प्रतिबिंब जन माणसात परावर्तित करावे - प्रमोद गायकवाड
कलाकाराला जात नसते, कलाकार हा समाजाचा आरसा असतो त्याने निर्मळ भावनेने समाजाचे प्रतिबिंब जन माणसात परावर्तित करावे - प्रमोद गायकवाड
। खोपोली । । महेंद्र ओव्हाळ ।
खोपोली दि. ०३: डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त, हिंसेला विरोध करता यावा आणि तरुणाई अधिकाधिक बोलकी व्हावी आणि एकत्र यावी म्हणून, महाराष्ट्र अंनिस-शाखा पनवेल व पनवेल विवेकवाहिनी, विवेक-जागर करंडक पथनाट्य सादरीकरण स्पर्धा पनवेल येथील के. ए. भाटिया माध्यमिक शाळा सभागृह, सेक्टर १८,नवीन पावेल-पूर्व, नवी मुंबई येथे १९ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडली. विवेक-जागर करंडक स्पर्धेत खोपोलीतील परिवर्तन नाट्य संस्थेच्या संघाने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विवेक जागर करंडक स्पर्धेत परिवर्तन नाट्य संस्थेचे अध्यक्ष कला दिग्दर्शक, लेखक प्रमोद गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून पारितोषिक जाहीर झाले होते. महाराष्ट्र अंनिस च्या खोपोली शाखेच्या वतीने सी. के मिसळ, खोपोली येथे त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाष काटकदौंड, कार्याध्यक्ष महेंद्र ओव्हाळ, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग कार्यवाह सुनील जगताप, रायगड जिल्हा युवा सहभाग विभाग कार्यवाह रोहन दळवी परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सचिव ज्योती भुजबळ, केतन गवळी आणि खालापूर तालुक्यातील नाट्य कलाकार उपस्थित होते. परिवर्तन नाट्य संस्थेच्या पुढील नाट्य प्रकल्पांसाठी यावेळी ऑडिशन घेण्यात आल्या. "कलाकाराला जात नसते, कलाकार हा समाजाचा आरसा असतो त्याने निर्मळ भावनेने समाजाचे प्रतिबिंब जण माणसात परावर्तित करावे" असे कलाकारांना मार्गदर्शन करत असताना प्रमोद गायकवाड बोलत होते. तसेच यावेळी खोपोलीतील नामांकित स्त्रीतज्ञ डॉ. सुभाष काटकदौंड लिखित नाट्य पुस्तके कलाकारांना भेट देण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत