*द्या एक मदतीचा हात " या उपक्रमातून मिळाली रा. जि. प. - शाळा - माठळ ला सहकार्यांची साथ*. .. ..
पाली - प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील हातोंडचे सुपुत्र पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू केलेला "*द्या एक मदतीचा हात*" या उपक्रमाच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद शाळा - माठळ येथे मिळाली सहकार्यांची साथ .
राजेंद्र वाघमारे यांची वर्गमैत्रीण सौ. उज्ज्वला कुलकर्णी यांनी त्यांचे पती श्री. निशिकांत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस एक सुंदर टिकावू टेबल व मुलांना खाऊ देवून मदतीचा हात दिला.
तसेच सौ. अर्चना राजेंद्र वाघमारे यांनी त्यांच्या सासूबाई सौ. सुनंदा रघुनाथ वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेस एक कॉम्पुटर भेट देवून मुलांना खाऊ वाटप केले.
सौ. मीनलताई जाधव यांनी दहा खुर्च्या शाळेस भेट स्वरूपात दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. सय्यद सर म्हणाले की , आमच्या शाळेस टेबल आणि कॉम्पुटरची नित्तान्त गरज होती. शाळेत टेबल नसल्याने आम्ही बेंचचा वापर टेबल म्हणून करत होतो. बेंच लहान मुलांच्या साईजचे असल्याने बसण्यास अडचणीचे ठरत होते. कसे तरी ऍडजस्ट करून आम्ही काम भागवत होतो. तसेच सध्याचे युग हे कॉम्पुटर युग आहे. मुलांना कॉम्पुटर म्हणजे काय हे कळायला आणि प्रत्यक्ष दिसायला हवे होते. मी राजेंद्र वाघमारे साहेबांना ही अडचण सांगितली होती. कारण राजेंद्र वाघमारे साहेब हे गेली कित्येक वर्षांपासून हातोंड परिसरातील आणि महागाव परिसरातील शाळांना आणि शालेय मुलांना वेगवेळ्या प्रकारे शैक्षणिक मदतीचा हात देत आले आहेत. त्यामुळे आमच्या शाळेची ही महत्वाची अडचण सोडवण्याकरीता एक आशेचा किरण त्यांच्यात दिसत होता. तो आज या रूपाने प्रकाशित झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सन्माननिय सौ. निकिता सुनील जाधव यांनी दहा खुर्च्याची भेट देवून अनमोल कार्य केले आहे. आमच्या शाळेत कोणी पाहुणे आल्यास त्यांना बसण्यासाठी खुर्ची नव्हती ती कमतरता आज या माध्यमातून पूर्ण झाल्याचे समाधान मिळत आहे. आम्ही रा. जि. प. शाळा - माठळ चे शिक्षक ,विद्यार्थी , पालक व शालेय शिक्षण समीती तर्फे राजेंद्र वाघमारे साहेबांचे , श्री निशिकांत कुलकर्णी साहेब व सौ. उज्ज्वला नि. कुलकर्णी मॅडम तसेच सौ. सुनंदा र. वाघमारे , सौ. अर्चना रा. वाघमारे आणि सौ. मीनल जाधव यांचे आभारी आहोत.
या निमित्त उपस्थित मान्यवरांमध्ये कार्यक्रमाचे सन्माननिय अध्यक्ष - आयु. रघुनाथ वाघमारे , सहकारी शिक्षक श्री गजानन धुसेपाटील , आयुनि. मिनाक्षी विकास म्हस्के , शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष श्री प्रवीण आवळे , पोलीस पाटील व माजी उपसरपंच सौ. अरुणा उतेकर ,सतीश मोरे ,पांडुरंग वाघमारे ,दत्तू गायकवाड ,अंगणवाडी ताई वैशाली आवळे , मदतनीस वेताळ मॅडम , ग्रामस्थ पालक माठळ व वावंडा आदिवासी वाडी आदीची मान्यवरांची उपस्थिति वंदनिय होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत