जांभूळपाडा व अडुळशे गणातील सर्वसाधारण जागांवर उमेदवारी देणार असल्याची वंचित बहुजन आघाडीची घोषणा
जांभूळपाडा व अडुळशे गणातील सर्वसाधारण जागांवर उमेदवारी देणार असल्याची वंचित बहुजन आघाडीची घोषणा
आनंद जाधव (पाली) : बुधवार, दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तर तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत पंचायत समितीच्या अडुळसे आणि जांभूळपाडा या गणातून सर्वसाधारण जागांवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जांभूळपाडा गणातून तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड हे उमेदवारी लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच अडुळसे गणातून दोन इच्छुकांची नावे समोर आली असून, या दोघांची चर्चा करून लवकरच अधिकृत उमेदवार जाहीर करणार असल्याचे स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.
बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, महासचिव आनंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, सचिव अशोक वाघमारे, संघटक राहुल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जगताप, श्रीधर साळुंखे, प्रशांत गायकवाड, रवि लोखंडे, तुकाराम शिंदे, संघटक प्रवीण गायकवाड, राहुल गायकवाड, संदीप ढाकावल, स्वप्निल कदम, विनोद कदम, संदेश गायकवाड, प्रफुल गायकवाड, नरेश जाधव आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत