HEADLINE

Breaking News

वडखळमधील ॲट्रोसिटी पीडित महिलेला पोलीस संरक्षण द्या, वंचित बहुजन आघाडीचे अमित गायकवाड यांची मागणी



|पेण||वार्ताहर| 

 पेण (ता: २०):  पेण तालुक्यातील वडखळ बोरी फाटा येथे राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या योगिता मिलिंद गायकवाड या ॲट्रॉसिटी पिडीत असून त्यांच्या आईची वडिलोपार्जित मिळकत असून या मिळकतीवर गैरकब्जा करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळून या ठिकाणी बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीच्या फ्लॅटची खरेदी विक्री होऊन ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी चे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी वडखळ पोलीस स्टेशनला तक्रारी निवेदन दिले आहे.
          वडखळ हद्दीतील सर्व्हे नं. ९ ही मिळकत बौद्ध समाजाच्या योगिता भिमसेन मोरे उर्फ योगिता मिलिंद गायकवाड यांच्या आईची वडिलोपार्जित मिळकत असून या मिळकतीवर गैर कब्जा करण्याच्या उद्देशाने खोटा सातबारा करून त्याची खरेदी विक्री करण्यात आली असून त्या जागेवर अनधिकृत इमारत बांधली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रांत कार्यालय पेण, रायगड जिल्हाधिकारी, सिडको प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. असे असतानादेखील या बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या इमारती मधील काही लोकांनी या मिळकतीवर गैर कब्जा करण्याच्या हेतूने याआधी देखील योगिता गायकवाड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या लोकांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत वडखळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून अलिबाग जिल्हा न्यायालयात केस सुरू आहे. असे असतानादेखील येथील काही लोक योगिता गायकवाड यांच्याविरोधात कट कारस्थान करीत आहे. या जागेवर गैर कब्जा करण्याच्या दृष्टीने बेकायदेशीरपणे दुकाने सुरू केली असून योगिता गायकवाड यांना जागेतून बाहेर काढण्यासाठी या इमारती मधील काही लोक कट कारस्थान रचत आहेत. त्यामुळे तिला व तिच्या परिवाराच्या जीवास धोका निर्माण आहे. याआधी देखील योगिता गायकवाड यांना त्रास देण्याच्या हेतूने त्यांच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटचा कब्जा घेण्यासाठी वयस्कर वृद्ध महिलांना आणून ठेवणे, शेडचे पाईप गायब करणे, धमकावणे अशा प्रकारचे वेगवेगळे कट कारस्थान करणे, तिच्याकडे व तिच्या लहान मुलांकडे रागाने बघणे, त्यांच्यावर दहशत माजवणे असे प्रकार या ठिकाणी होत असल्यामुळे योगिता गायकवाड या बौद्ध समाजाच्या महिलेला व तिच्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अशा व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी तसेच सदर इमारत अनधिकृत असल्याबाबतची नोटीस या इमारतीच्या बिल्डरला दिली असतानादेखील या इमारतीचे फ्लॅट बेकायदेशीररित्या भाड्याने दिले जात आहेत. तसेच सदर इमारत बेकायदेशीर असल्याकारणाने या इमारतीच्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशनवर दुय्यम निबंधक कार्यालयात बंदी असताना देखील या इमारती मधील काही लोक फ्लॅट बेकायदेशीर रित्या खरेदी विक्री करू पाहत आहेत तर इमारती मधील काही गाळ्यामध्ये बेकायदेशीररित्या दुकाने देखील सुरू केली आहेत. त्यामुळे फ्लॅटची बेकायदेशीरपणे खरेदी विक्री होऊन ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून देखील सतर्कतेचे आवाहन करण्यात यावे अशा आशयाचे तक्रारी निवेदन वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी वडखळ पोलीस स्टेशनला दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका युवक अध्यक्ष संजय गायकवाड, खालापूर तालुका युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड, मिलिंद गायकवाड आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत