पेण मध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन
पेण: ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन मानव संसाधन विकास संघटना रायगड जिल्हा आणि डॉक्टर एन डी ज पोर्क्टोलॉजी अँड पाईल्स सोल्युशन हॉस्पिटल ( डॉक्टर राठोड ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मानवाधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार कार्यकर्ते यांच्या वतीने पेण सरकारी हॉस्पिटल मध्ये रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात जमा होणारा रक्तसाठा नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. जखमी सैनिकांच्या उपचारासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराला आम्हा सामान्य नागरिकांकडून हा मदतीचा हात असल्याचे संघटनेचे PRO महाराष्ट्र राज्य तसेच रायगडचे वादळ साप्ताहिक समाचार पेण तालुका पत्रकार श्री गंगाधर जोशी यांनी सांगितले. रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेले तीस दिवस संघटनेचे कार्यकर्ते आणि डॉक्टरांची तुकडी कार्यरत आहेत. रक्तदात्यांची पूर्वनोंदणी करून त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि इतर तपासण्या सध्या सुरू आहेत. रक्तदानाचे महत्व. नियमित अंतराने म्हणजेच तीन महिन्यांनंतर रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते आणि रक्तदात्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नसते. नियमित रक्तदान केल्याने कर्करोगासह इतर आजारांचा धोकाही कमी होतो. मानव संसाधन विकास संघटना रायगड जिल्हा पदाधिकारी भिमराव सुतार जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य, भालचंद्र पाटील - जिल्हा अध्यक्ष आनंद काळण - रायगड उपाधक्ष्य रुपेश ठाकूर - रायगड सचिव राजेश म्हात्रे रायगड - सल्लागार संजय डंगर कर्याधक्ष्य रायगड, Dr. राठोड अध्यक्ष पेण तालुका, उदय ढवळे - उपाधक्ष पेण तालुका, विजय पाटील अध्यक्ष अलिबाग तालुका प्रफुल गावंड अध्यक्ष उरण तालुका, अशोक मांजरेकर. कुंदा जगनाडे, गजानन भोईर, हरेश थळे, हरेश पाटील, प्रदीप गायकवाड, समाधान पाटील, अनिकेत जोशी, अजय जोशी, गजानन पाटील, किरणकुमार पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, कृष्णा म्हात्रे, सदानंद पाटील , प्रदीप गायकवाड, अजय जोशी, काळू राम मलविया के एम पाटील हरिष पाटील अनिकेत जोशी महेश पाटील, समाधान पाटील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत