17 महिला कामगारांची पिळवणूक, 12 तास काम, पण 8 तासाचे दाम.
सुधागड तालुक्यातील घोटावडे हद्दीतील श्री राज एज्युकेशनसेंटरस्कुल मध्ये होतेय 17 महिला कामगारांची पिळवणूक गेली 10-12 वर्षे प्रामाणिक काम करून सुद्धा महिलांना हजेरी 160 ते 240 एवडीचं दिली जात आहे. हजेरी कमी देऊन कामाचे तास देखील वाढवले जात आहेत. घडणाऱ्या प्रकारची माहिती महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधागड तालुका अध्यक्षा -हर्षदाताई शिंदे यांच्या कडे दिली असता. रायगड जिल्हा अध्यक्षा सौ. सपनाताई राउत-पाटिल, रायगड जिल्हा सचिव सौ.आकांक्षाताई शर्मा-सावंत, रायगड जिल्हा उपाध्यक्षा सौ.छायाताई शिंदे,यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित श्री राज एज्युकेशन सेंटर चे CEO जे. के जोशी यांच्यासोबत मिटिंग घेऊन कामा संदर्भात जाब विचारण्यात आला,सदर मिटिंग मध्ये CEO जे.के.जोशी यांनी आश्वासित केलय कि येत्या एप्रिल महिन्यापासून महिलांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. सदर विषयाला घेऊन सुधागड तालुका अध्यक्षा -सौ हर्षदाताई शिंदे यांनी जाब विचारत तंबी दिली की लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आपल्या विरोधात तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल आणि सदर आंदोलनाने काही विपरीत परिणाम घडले तर त्यास आपण जबाबदार असाल.सदर प्रसंगी उपस्थित रायगड जिल्हा अध्यक्षा सौ. सपनाताई राउत-पाटिल,रायगड जिल्हा उपाध्यक्षा सौ.छायाताई शिंदे,सुधागड तालुका अध्यक्षा सौ. हर्षदाताई शिंदे व महिला कामगार उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत