HEADLINE

Breaking News

पनवेल मध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन व नामफलक अनावरण सोहळा उत्साहात संपन्न "गाव तेथे शाखा, गाव तेथे कार्यकर्ता" उद्देशासह वंचित बहुजन आघाडीला नव-संजीवनी.




   प्रतिनिधी- सत्ता संघर्षात जनतेच्या विकासाचा मूलभूत विचार बाजूला सारून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेण्यात मश्गूल असताना वंचित बहुजन आघाडी सारखा स्वाभिमानी बाणा असलेला पक्ष जनतेच्या पसंतीस उतरत आहे. 

पनवेल तालुतालुक्याती चावंडोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम नुकताच पार पडला असून तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापने सह नाम फलकाचे अनावरण वंचित जिल्हा महासचिव वैभव केदारी , युवा जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते केले असल्याचे तालुका अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी माहिती दिली.

वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात मरगळलेळी वंचित पुन्हा सतेज करत गांव तेथे शाखा स्थापन करून पुढील आगामी होणाऱ्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील चांवडोली गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला .

यावेळी मुख उपस्थिती जिल्हा महासचिव वैभव केदारी ,जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड ,जिल्हा सल्लागार प्रकाश गायकवाड , जिल्हा संघटक आशिष जाधव उपस्थित होते.

शाखा उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमितजी गायकवाड साहेब यांनी "इतर पक्षांत भरकटलेल्या तरुणांनी ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत सामील व्हा" असे आवाहन केले आहे.



तसेच  रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी यांनी "येत्या काळात शोषित, पिडीत, वंचित, शेतकरी, कामगार, महिला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात जिल्हा युवाध्यक्ष अमित गायकवाड, जिल्हा महासचिव वैभव केदारी, पेण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण भालेराव, खालापूर युवाध्यक्ष प्रशांत गायकवाड, रोहित पवार नारायण जाधव यांच्यासह पनवेल तालुकाध्यक्ष प्रभाकर जाधव अदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत