HEADLINE

Breaking News

मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधागड तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 





पाली, ता. 3 (वार्ताहर) मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड प्रेस क्लबच्या वतीने रविवारी (ता.3) पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधागड तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

     तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले. यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद भोईर, कार्याध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ, उपाध्यक्ष संतोष उतेकर व जेष्ठ पत्रकार राजेंद्र मेहता यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी सांगितले की पत्रकार सर्वसामान्य जनतेचा आरसा आहे. रस्त्यावर उतरून तो सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत असतो, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतो. मात्र कामाच्या व्यापात पत्रकारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळेच पत्रकारांचे आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांनी आपले आरोग्य सदृढ व निरोगी ठेवणे गरजेचे आहे असे देखील ओव्हाळ यांनी सांगितले. यावेळी पत्रकाराचे ब्लडप्रेशर, साखरेची पातळी, वजन व उंची तपासून आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. व पुढील रक्त व इतर तपासण्यासाठी सांगण्यात आले.  

    शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे, पाली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका खरात. आरोग्य केंद्र खवली वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता नाईक, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजय गायकवाड व समीर शेख, तालुका क्षयरोग पर्यवेक्षक विशाल महाजन, औषध निर्माण अधिकारी सुदेश पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिज्ञा शेरमकर, परिचारिका विनया सोडिये, समाधान भगत, श्रद्धा गोरे व शाम खोडागळे यांनी परिश्रम घेतले.  

    यावेळी पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ, विनोद भोईर, संतोष उतेकर, गौसखान पठाण, अमित गायकवाड, राजेंद्र मेहता, निशांत पवार, अनुपम कुलकर्णी, संदेश उतेकर, प्रशांत हिंगणे, भगवान शिंदे, निवास सोनावळे व राजेश गायकवाड आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 



फोटो ओळ, पाली, पत्रकारांची वैद्यकीय तपासणी करताना आरोग्य अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र, अमित गवळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत