जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाचे औचित्य साधून "उद्धर व शिरसे आदिवासीवाडी" येथील आदिवासी आणि दिव्यांग बांधवांना पोशाख वाटप
| पाली | | प्रतिनिधी |
विद्यार्थी उन्नती संघ,नागोठणे कुंभारआळी या संघटनेस ३१ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ विद्यार्थी उन्नती संघ आणि प्रज्योती पुस्तकपेढी, जोगेश्वरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि.०३.१२.२०२३ रोजी जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाचे औचित्य साधून "उद्धर व शिरसे आदिवासीवाडी" येथील आदिवासी आणि दिव्यांग बांधवांना एस.कुमार या नामांकित कंपनीचे मोफत नवीन पोशाख वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास संघाचे माजी अध्यक्ष कांचन वाडेकर आणि त्यांचे मुंबई येथील सहकारी राजेश सावंत अजय शिगवण, दिनेश चव्हाण, आणि संघाचे विद्यमान अध्यक्ष दीपक वाडेकर, सचिव रोहिदास हातनोलकर,खजिनदार सचिन वासकर, आणि सदस्य ,अनिल नागोठणेकर, मिलिंद धाटावकर, आनंद धाटावकर, दिपक नागोठणेकर, मंगेश नागोठणेकर , शैलेश नगोठणेकर व प्रतिभा दिपक वाडेकर, रायगड जिल्हा कुंभार समाज महिला अध्यक्ष व ग्रामस्थ कु. राहूल दिपक नागोठणेकर आणि स्थानिक ग्रामस्थ श्री.अरूण शिंदे व श्री.लक्ष्मण शिंदे उपस्थित राहिले. या आदिवासीवाडीवरील सर्व आदिवासी आणि दिव्यांग बांधव यांनी या मोफत पोषाख वाटप कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी उन्नती संघाच्या पदाधिकारी व सदय यांचे मनापासून आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत