HEADLINE

Breaking News

पाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव

 



पाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव

।पाली।वार्ताहर।

पाली नगरपंचायत कार्यालयावर सोमवारी (ता.४) भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूणकर यांना घेराव घातला. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. भाजप सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ या मार्चात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने पाली गावाच्या विकासासाठी जवळपास कोटींचा निधी मार्च महिन्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु त्या कामांच्या वर्कऑर्डर अद्याप देण्यात आल्या नाहीत. हा प्रकार प्रशासनाकडून जाणीव पूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाचे केला आहे. त्याच प्रमाणे आदिवासी विभागाकडून मागील ४ महिन्यापूर्वी ठक्कर बाप्पा योजनेचा प्रस्ताव सादर करण्या संदर्भात सांगण्यात आले होते. मात्र आजपर्यंत तो प्रस्ताव पाठवण्यात आलाच नाही? या संदर्भात मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर वारंवार नगराध्यक्ष यांच्या पतीचे नाव सांगण्यात येते. त्यामुळे नगराध्यक्षांच्या कामात पतीचा हस्तक्षेप कशासाठी? यावर जाब विचारण्यात आला. भाजपाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत कर वसुली बाब गणपतीपासून बंद केल्याचे सांगण्यात आले. परंतु अद्यापही सुरु असून याला ज्याचे पाठबळ आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पर्यावरण व स्वछतेच्या नावावर होत असलेली स्थानिक आणि गणेश भाविकांची होणारी लूट थांबावी, विकास कामे अडवू नयेत, ऑनलाईन निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार थांबावा या मागण्यावर भाजपा व स्थानिक नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालत आपल्या मागण्याची पुर्तता करण्या विषयी लेखी निवेदन दिले. या मोर्चात भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य व दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, अलाप मेहता, सागर मोरे, सुशील थळे, आरिफ मनियार, सुशील शिंदे, प्रदीप दाद् गोळे, नरेश खाडे व रवी ठोंबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बुरूमाळी, झाप, आगर आळी नवीन वसाहत, देऊळवाड, तळई, गोमारी, सोसायटी वाडी, आणि पालीच्या विविध विभागातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यकारी विद्या येरूनकर यांनी गायराना रितल्या निवेदनाच्या अनुषंगाने लेखी अहवाल दिला आहे. भाजपा व नागरिकांनी केलेल्या मागण्यांमधील विकास कामांच्या वर्कऑर्डर येत्या १५ दिवसात देण्यात येतील, ठक्कर बाप्पा योजनेचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे तयार असून लवकरच संबधित कार्यालयाकडे सादर करण्यात येईल, पर्यावरण व स्वच्छता कर वसुली बाबत संबंधितांना यापुर्वी बंद करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. तसेच सदर ठेक्या बाबत जिल्हाप्रशासन अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाही करिता सादर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. महिला नगरसेवक सदस्यांच्या पती हस्तक्षेप बाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन परिपत्र क्र. जीईएन -१०९/१३४५/प्र.क./१०६/९३/नवी - मंत्रालय यांच्या परिपत्रकाप्रमाणे इथून पुढे दक्षता घेण्यात येईल. तसेच संदभॉय तक्रार जिल्हाधिकारी रायगड यांना कळविण्यात येईल आणि ऑनलाईन निविदा प्रक्रिये संदर्भात कायदिश देण्यात आले असून त्या संदर्भात जिल्हाप्रशासन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात यईल, असे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरुणकर यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत