HEADLINE

Breaking News

ग. बा. वडेर हायस्कूल मध्ये शिरला साप सर्पमित्राने दिले जीवदान


अमित गवळे

पाली, ता. 11 (वार्ताहर) पालीतील ग. बा. वडेर हायस्कूल मध्ये गुरुवारी (ता. 11) सकाळी 7 वाजताच्या सुमारास एक साप शिरला होता. या सापाला पाहून शिक्षक व विद्यार्थी घाबरले होते. मात्र पालीतील सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी या सापाला शिताफिने पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. 
  हा छोटा अजगर जातीचा साप होता. त्याने उंदीर खाल्ला होता. त्यामुळे त्याला जलद हालचाल करता येत नव्हती. दत्तात्रय सावंत यांना शिक्षक दिलीप जगताप यांनी शाळेत साप आल्याची माहिती दिली. तर शिक्षक महेश बारमुख हे सावंत यांना शाळेत घेऊन आले. अजगराला पकडतांना शिक्षक व विद्यार्थी जमले होते. सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी उपस्थितांना सापांबद्दल शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती केली. व त्यानंतर सापाला जंगलात सुखरूप सोडून दिले. 


फोटो ओळ, पाली, सापाला पकडून नेतांना सर्पमित्र दत्तात्रय सावंत शेजारी शिक्षक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत