पोलीस पाटलांना मानधन 3 महिने न दिल्याने गणपती सारख्या सणात पोलीस पाटील नाराज रायगड जि. अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना रा. जि. पो. पा. संघटनेकडून निवेदन
रायगड जिल्हा उत्तर प्रतिनिधी/मंगेश यादव :
रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मे, जून, जुलै मानधन न मिळाल्यामुळे पोलीस पाटील नाराज असल्याचे दिसून येत आहेत. तोंडावर गणपती सण आला असून मुलाबाळांना कपडे घेणे, गणपती घरात असल्याने गणपतीचा हा खर्चाऊ महिना असल्याने गणपती सणाला काय करायचे असा प्रश्न पोलीस पाटलांचा समोर उभा ठाकला आहे. गणपती सारख्या मोठ्या सणाला कसे सामोरे जायचे मानधन नाही. पोलीस पाटलांना आठ दिवस गणपतीत दिवस-रात्र आपल्या गावात कुठे ही वादविवादाचा प्रकार घडू नये म्हणून पोलीस पाटील आपली ड्युटी बजावत असतात. पोलीस पाटलांनी सण कसे साजरे करावे. यासाठी न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना रायगड जिल्हा पदाधिकारी यांनी मानधन संदर्भात रायगड अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना मानधन येत्या काही दिवसात मिळावे असे विनंतीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस पाटील संघटना रायगड जि. कार्याध्यक्ष राम सावंत, उपाध्यक्ष श्रीधर गोळे, सचिव महेश शिरसे, नवी मुंबई अध्यक्ष संजय पाटील, खजिनदार संजय बारस्कर उपस्थित होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले की तुम्हाला लवकरात लवकर मानधन मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत