शिवसेनेच्या पाली शहर प्रमुखपदी विद्देश आचार्य याची नियुक्ती
पाली : विधानसभेच्या
निवडणुका काही महिन्यावर येवून ठेपलेल्या असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाली शहरात संघटनात्मक बदलाला सुरुवात केली असून पाली शहर प्रमुखपदी एक उमदा युवा कार्यकर्ता म्हणून विद्देश आचार्य यांची नुकतीच निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाषजी देसाई साहेव, शिवसेना नेते अनंतजी गिते साहेब व संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील यांच्या सूचनेनुसार पाली शहर प्रमुख या पदावर पाली शहरातील रामआळी येथील निष्ठावंत शिवसैनिक विदेश आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते पाली मधील एका कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सुधागड तालुका संपर्कप्रमुख विनेश सीतापराव, तालुकाप्रमुख दिनेश चिले, युवासेना जिल्हाधिकारी सचिन
डोबळे, पेण सुधागड मतदार संघ युवासेना अधिकारी किरण पिंपळे, आदि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विदेश आचार्य म्हणाले की पक्षश्रेष्ठीने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याकरता मी शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून पाली शहरातील पक्ष संघटन मजबूत "करण्याचे काम मी प्रामाणिकपणे करेन. या निवडीनंतर विद्देश आचार्य यांना जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, प्रशांत शितोले, तालुका संघटक रमेश सुतार, उपतालुकाप्रमुख किशोर दिघे, सुधागड युवासेना अधिकारी नंदेश पालांडे, सुधागड महिला संघटीका वर्षा सुरावकार, नेत्रा पालांडे, वृषाली खरीवले, अंतरा यादव, विभाग प्रमुख नांदगाव प्रवीण ओमले, उपविभाग प्रमुख सदू भोईर, आदिसह शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत