HEADLINE

Breaking News

कुंभार समाज सामाजिक संस्था* *रायगड जिल्ह्याची परळी येथे सभा संपन्न*








 पाली / जनतेची जत्रा 
दि 5 जानेवारी 2025 रोजी सभा संपन्न होत झाली रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर युवक अध्यक्ष शरद कुंभार सर  सेक्रेटरी दिलीप साळवी कार्याध्यक्ष रमेश दहिवलीकर खजिनदार सुनील अंजार्लेकर विवाह समस्या निवारण समितीचे अध्यक्ष गजानन चौलकर रायगड जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभाताई वाडेकर उपाध्यक्ष नंदकुमार चिरनेरकर अनिल नागोठणेकर रायगड सहसचिव मधुकर राजाराम बिरवाडकर बामनोलकर  राजेश म्हप्रलकर महाराष्ट्र प्रदेशचे वसंत कुंभार ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री योगेश कुंभार तसेच सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
 श्री संत गोरोबा काका यांच्या मूर्ती चे पूजन करण्यात आले  मृत पावलेल्या सर्व समाज बांधवांना आणि शहीद जवानांन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली 
सर्व मान्यवरांचे स्वागत परळी कुंभार समाज यांच्या वतीने करण्यात आले ऍड प्रवीण कुंभार यांनी सूत्रसंचालन केले 
मागील इतिवृत सेक्रेटरी दिलीप साळवी यांनी वाचून दाखविले 
रायगड जिल्हा युवक अध्यक्ष शरद कुंभार यांनी पुढील सभेचे मार्गदर्शन केले वधू वर मेळावा व सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्याचे सर्वांमध्ये ठरवण्यात आले
वधू वर मेळाव्या साठी प्रवीण कुंभार आणि सुधागड तालुका कुंभार समाज  अध्यक्ष श्री सुनील वाघोस्कर यांनी पुढाकार घेतला त्या बद्दल गजानन चौलकर गुरुजी यांनी त्यांचे आभार मानले 
वधू वर मेळाव्या साठी सर्व तालुका अध्यक्ष सर्व रायगड जिल्हा सर्व सभासद यांना खारीचा वाटा घेतला तरी आपला कार्यक्रम चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो  असे विचार रायगड चे अध्यक्ष यांनी मांडले 
वधू वर मेळाव्या साठी परळी कुंभार समाज महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखवला त्या बद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद 
त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते आर्टिजन कार्ड चे वाटप करण्यात आले 
आर्टिजन कार्ड विषयी माहिती तसेच कार्ड चे फायदे या बद्दल सर्व माहिती रामदास साळवी यांनी दिली 
परळी कुंभार समाज महिला यांची उपस्थिती पाहून गजानन चौलकर गुरुजी यांनी त्यांचे खूप खूप आभार मानले त्यानंतर गुरुजी नि कार्ड विषयी विशेष माहिती दिली सरकार दरबारी कार्ड ची किंमत काय आहे हे देखील सांगितले 
वधू वर मेळावा दि. 9 फेब्रुवारी ला होणार आहे परळी कुंभार समाज त्या बद्दल ठिकाण कळवेल 
त्या नंतर पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून बजरंग भागवत यांची निवड करण्यात आली त्यांना नियुक्त पत्र देऊन सन्मान करण्यात आला 
रायगड जिल्हा कुंभार समाज याचा संपूर्ण जमा खर्च खजिनदार सुनील अंजर्लेकर यांनी वाचून दाखवला 
या नंतर अध्यक्ष यांचे भाषण झाले अध्यक्ष यांनी सर्व समाज एक होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय 
वधू वर मेळाव्या साठी प्रत्येक तालुका प्रत्येकी 2000/- रुपये जमा करावे  असे रायगड जिल्हा अध्यक्ष महाडकर यांनी सांगितले 
या नंतर रायगड जिल्हा युवक अध्यक्ष  शरद कुंभार यांनी आभार मानले परळी कुंभार समाज यांनी जेवण आणि सभेस उत्तम व्यवस्था केली त्यांचे मना पासून आभार मानले

रायगड जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष 
श्री योगेश यशवंत कुंभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत