वाकणवाडी व अडुळसे येथील नागरिकांना ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम
पाली / अमित गायकवाड - दिनांक ११ व रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ मुंबई संस्थेच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायत अडुळसे हद्दीतील वाकणवाडी व पायरीचीवाडी गावात संस्थेचे अध्यक्ष श्री दत्ताराम पोंगडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम संपन्न झाला. श्री रामचंद्र पिंपळे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाला ह.भ.प. महेश महाराज पोंगडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस श्री विश्वास चांदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संस्थेचे हिशोब तपासणीस श्री प्रतिक अधिकारी यांनी सुत्रसंचलन केले.
सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ मुंबई संस्थेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष श्री हरिश्चंद्र नाडकर, उपाध्यक्ष श्री संजय अधिकारी, उप सेक्रेटरी श्री मयुर नाईक, खजिनदार श्री शरद लहाने, उप खजिनदार श्री महेश सकपाळ, श्री जयवंत वाघमारे, श्री दयाराम जवके, मा. उपाध्यक्ष श्री एकनाथ पडवळ, मा. सरचिटणीस श्री यशवंत वाघमारे, मा. सेक्रेटरी श्री रामजी भिलारे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
वारकरी महासंघाचे ह.भ.प. श्री महेश महाराज पोंगडे, अडुळसा ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर फोंडे, माजी सदस्य श्री भगवान दळवी, माजी सदस्य श्री तुकाराम ठोंबरे, माजी सदस्य राजेश शिर्के यांनी स्थानिक पातळीवर मोलाचे सहकार्य केले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत