*वावोशीच्या उपसरपंच दिपाली गुरव यांच्यावरचा अविश्वास ठराव अपयशी; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता..* *वावोशीत उपसरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला; बहुमताचा अभाव ठरला निर्णायक*
वावोशी/जतिन मोरे: - वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दिपाली गणेश गुरव यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव बहुमताच्या अभावामुळे फेटाळण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी तहसीलदार अभय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत या ठरावावर चर्चा व मतदान घेण्यात आले होते. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ३/४ सदस्यांचे बहुमत आवश्यक होते. मात्र, ठराव मांडलेल्या ६ सदस्यांपैकी मंजुळा चंद्रकांत पवार अनुपस्थित राहिल्याने फक्त ५ सदस्यांनीच मतदान केले. परिणामी, आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे ठराव तहसीलदारांनी फेटाळला.
२०२२ च्या वावोशी ग्रामपंचायत निवडणुकीत वावोशीतील रिया रुपेश वालम वगळता सर्व सदस्यांनी एकाच पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आलेल्या या ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता होती. मात्र, उपसरपंच दिपाली गुरव या भाजपच्या कार्यकर्त्या असून त्यांच्याविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावामुळे राजकीय असमतोल समोर आला आहे.
*अविश्वास ठरावाची मुख्य कारणे:*
१. उपसरपंचांचा मनमानी कारभार.
२. सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे.
*ठराव मांडणारे सदस्य:*
१. आश्विनी उदय शहासने - सरपंच
२. मयूर रमेश धारवे - ग्रामपंचायत सदस्य
३. भारती मारुती नाईक - ग्रामपंचायत सदस्य
४. रिया रूपेश वालम - ग्रामपंचायत सदस्य
५. मच्छिंद्र जनार्दन वाघमारे - ग्रामपंचायत सदस्य
*ठराव फेटाळण्याचे कारण:*
१. वावोशी ग्रामपंचायत सदस्या मंजुळा चंद्रकांत पवार अनुपस्थित राहिल्या.
२. ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले ३/४ बहुमत मिळाले नाही.
उपसरपंच दिपाली गुरव यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला असला तरी वावोशी ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. एकाच पॅनेलमधील सदस्यांमधील वैचारिक मतभेद आणि स्थानिक राजकीय संघर्ष आगामी निर्णयप्रक्रियांवर प्रभाव टाकू शकतो. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. यावेळी नायब तहसिलदार सुग्रीव वाघ, वावोशी मंडळ अधिकारी सचिन वाघ, तलाठी प्रियांका वांगे, पोलीस पाटील मनीष हातनोलकर, ग्रामसेवक विवेक वासकर, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव, पोलीस हवालदार सतिष जगधने, पोलीस नाईक लोखंडे, डेटा ऑपरेटर आरोही कदम आदी उपस्थित होते. उपसरपंच दिपाली गुरव यांच्यावरील अविश्वास ठराव जरी फेटाळला असला तरी वावोशी ग्रामपंचायतीच्या भविष्यातील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत