*जिल्हा परिषदेत लिपिकाचा १.१९ कोटींचा घोटाळा! अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांनी सरकारी तिजोरीला चुना* रायगड जिल्हा परिषदेतील महाघोटाळा! लिपिकाने १.१९ कोटी लाटले, बनावट सह्यांचा गैरप्रकार उघड
*जिल्हा परिषदेत लिपिकाचा १.१९ कोटींचा घोटाळा! अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांनी सरकारी तिजोरीला चुना*
रायगड जिल्हा परिषदेतील महाघोटाळा! लिपिकाने १.१९ कोटी लाटले, बनावट सह्यांचा गैरप्रकार उघड
*सरकारी तिजोरीला लुटणारा लिपिक! १.१९ कोटींचा घोटाळा, चौकशीत आणखी मोठ्या अपहाराची शक्यता..*
*अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, पत्नीच्या खात्यात पैसे! लिपिकाचा १.१९ कोटींचा घोटाळा फोडला..*
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. वरिष्ठ सहायक लिपिक नाना कोरडे याने अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून तब्बल १ कोटी १९ लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा ४ कोटी रुपयांच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बनावट सह्या, कर्मचाऱ्यांच्या नावावर पैसे आणि पत्नीच्या खात्यात रक्कम वळती!
जिल्हा परिषदेतील पगार आणि अन्य फरकाच्या रकमांसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रणालीचा गैरफायदा घेत नाना कोरडे याने बनावट धनादेश तयार केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करीत, कर्मचाऱ्यांच्या नावावर मोठ्या रकमा काढल्या आणि त्या आपल्या तसेच पत्नी सोनाली कोरडेच्या खात्यात वळती केल्या.
हा घोटाळा मार्च महिन्यात, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन सुरू असताना समोर आला. एका सामान्य कर्मचाऱ्याच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर झाल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले.
फक्त दीड वर्षात १.१९ कोटींचा अपहार!
चौकशीअंती उघड झाले की, केवळ दीड वर्षांत कोरडे याने १ कोटी १९ लाख रुपयांचा अपहार केला. जिल्हा परिषदेने त्वरित कारवाई करत पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. तपासात असे आढळले की, कोरडे याने लिपिक पदाचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांची बनावट सह्या करून लाखोंचा अपहार केला आहे.
६८ लाख परत, पण शिक्षा अटळ!
भानगड उघड झाल्याचे लक्षात येताच नाना कोरडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पाय धरून माफी मागितली आणि ६८ लाख रुपये परत केले. मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आता उर्वरित रक्कम वसूल करण्याबरोबरच त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभागातही गैरव्यवहार?
याआधी २०२० साली कोरडे हे महिला व बालविकास विभागात कार्यरत होते. तेथेही त्यांनी असाच घोटाळा केला असण्याची शक्यता असल्याने चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे हा घोटाळा अजून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराकडे निर्देश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा संपूर्ण प्रकरण जिल्हा परिषदेत मोठ्या हलकल्लोळाला कारणीभूत ठरले असून, सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता कोरडेवर कोणती कठोर कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत