शिंदे गटाला मोठे खिंडार, दिग्गज नेते प्रकाश देसाई यांचा भाजपात जाहीर प्रवेश, माजी सभापती,उपसभापतींसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शन.
निशांत पवार,
पाली, रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजप मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा बडा नेता प्रकाश देसाई यांनी रविवारी दि. ०९ रोजी पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश केला. माजी सभापती उज्वला देसाई,माजी सभापती पिठू डुमना, माजी सभापती सौ. पुष्पा डुमना, माजी पंचायत समिती सभापती श्री संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई, व त्यांचे समर्थक परळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच अलका देशमुख, धर्मेंद्र आंदेकर व सर्व सदस्य, घोटवडे सरपंच व सदस्य , नेनवली, राबगाव,वाघोशी सह अन्य ग्रामपंचायतीमधील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जाहीर भाजप पक्ष प्रवेश केला. माजी सभापती उज्वला देसाई,माजी सभापती पिठू डुमना, माजी सभापती सौ. पुष्पा डुमना, माजी पंचायत समिती सभापती श्री संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई, व त्यांचे समर्थक तसेच तसेच साईनाथ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी ही भाजपात प्रवेश केला.
यावेळी संपूर्ण सुधागड तालुका भाजपमय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील,आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश देसाई यांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले. याचवेळी खासदार व आमदार यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी पालीतील लिमये सभागृह अफाट गर्दीने फुलून निघाले होते. यावेळी प्रकाश देसाई यांच्यासारखा बलाढ्य व सक्षम नेता भाजपाच्या प्रवाहात आल्याने पक्षाला संघटनात्मक उभारी मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले. पुढे बोलताना खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की प्रकाश देसाई व माझे कौटुंबिक नाते आहे. माझे वडील मोहनभाई यांचे व प्रकाश भाऊ यांचे सलोख्याचे व स्नेहपूर्ण नाते होते. एक काळ असा होता की शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी या पक्षाचे प्राबल्य होते. मात्र आता या पक्षातील तुल्यबळ नेते व पदाधिकारी भाजपात दाखल झाले आहेत, पक्षाची ताकत वाढली आहे याचा आनंद वाटत आहे. भाजपची ताकत ही जशी सुधागडात दिसते तशीच ताकत रायगड व राज्यात दिसते, तशीच ताकत दिल्लीतही दिसून आली असे वक्तव्य करीत धैर्यशील पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यात जाण फुंकली.
भाजपची ताकत सर्व धर्मात सर्व समाजात सर्व जातीत वाढत चालली आहे. नरेंद्र मोदी आज देशाचे नेतृत्व करताना संपूर्ण जगात ही मोदींजींचे कौतुक होत आहे. सुधागडातील हा मेळावा हा भाजपमय असल्याचे चित्र दिसून आले. भविष्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची एकमेव ताकत दिसली पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम करावे असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. यावेळी खासदार पाटील यांनी भाजपच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी प्रभावी व महत्वाकांक्षी योजना ही मांडल्या .
यावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील होणं म्हणजे एका वेगळ्या विश्वात प्रकाश देसाई सामील झालेत असे असले तरी हे विश्व असण्यापेक्षा हा एक परिवार आहे, आणि या देशाला भारत मातेला विश्वगुरु बनवायचे आहे. ते केवळ नरेंद्र मोदींच करू शकतात. भारतीय जनता पार्टी केवळ एक पार्टी नसून परिवार, एक संस्था नाही तर संस्कार असल्याची भावना विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की प्रकाश देसाई यांच्यासारखे बलाढ्य व्यक्तिमत्त्व व सक्षम सहकारी पक्षात आल्याने पक्षाला उभारी मिळणार आहे. आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या वेळी घेतला त्याचा आम्हाला आज सार्थ अभिमान वाटत आहे. आजच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आलेल्या हजारो महिला पुरुष हे एका आशेने इथं आल्या असून भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात त्यांना देखील विकासाची खात्री आहे, ही विकासाची गंगा आमच्या खेड्या पाड्या पर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत पोहचणार आहे. असा विश्वास आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.
प्रकाशभाऊ देसाई आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होतेच पण आता दिल्ली निवडणुकीत ही भाजपने आपला करिश्मा दाखवून वर्चस्व प्रस्थापित केले . देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न देशाचे नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे व त्याच दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. नरेंद्र मोदींजीनी या देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय जनता पार्टी देशाला उज्वल भवितव्याकडे नेऊ पाहत आहे. खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात जायचे असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही हे मी व माझ्या सहकाऱ्यांनी जाणले. व आम्ही एकसंघपणे एक दिलाने निर्णय घेतला व कमळ हाती घेण्याचे निश्चित केले. भारतीय जनता पार्टी हा एक महासागर आहे, आणि याच महासागरातून आपल्याला विकास साधायचा आहे. भविष्यात एकसंघपणे हातात हात घालून काम करूया,खऱ्या अर्थाने सुधागड व रायगड जिल्हा सुजलाम , सुफलाम करूया, रायगडचा सर्वांगीण विकास घडवूया असे प्रतिपादन देसाई यांनी आपल्या मनोगतात केले. खऱ्या अर्थाने मातृशक्तीला सबळ करण्याचे काम भाजप अन भाजपच्या नेत्याने केले.विविध संस्था उभारून महिलांना सक्षम केलं जाते आहे. गाव खेड्या पाड्यातील महिलांची सहकार चळवळ येत्या काळात अधिक गतिमान करूयात. अनेक लोकाभिमुख, जनकल्याण कारी योजना राबवून महिला पुरुषांना सक्षम करण्याचे काम भाजपने केले. सुधागड सह रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषदेत केवळ आणि केवळ भाजप चेच कमळ फुलल्याचे पहावयास मिळेल. असे देसाई म्हणाले.
यावेळी भाजप नेत्या गीता ताई पालरेचा व राजेश मपारा, आरिफ मणियार यांनी ही मनोगत मांडले. यावेळी खासदार धैर्यशील पाटील,आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजप नेत्या गीताताई पालरेचा, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता,सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, आरिफ मणियार , विठ्ठल सिंदकर,सुभाष पाटील, दिपक पवार, वैशाली मपारा, प्रणाली शेठ, भास्कर पार्टे,सुशील शिंदे, रमेश साळुंके,रोहन दगडे ,नगरसेवक पराग मेहता, जुईली ठोंबरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत