HEADLINE

Breaking News

श्री. बिपीन पाटील सर यांचा सेवापुर्ती समारंभ सोहळा साजरा.




आनंद मनवर 

जिल्हा प्रतिनिधी रायगड.


पाली  - दिनांक 31/1/205 रोजी मा. श्री. बिपीन पाटील सर प्रभारी मुख्याध्यापक यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात को. ए. सो. डॉ. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी येथे साजरा कारण्यात आला.श्री. बिपीन पाटील सर तसें खुप कष्ट करुन आपले शैक्षणिक जीवन सुरु करुन पुढील जीवनात जिद्दीने पुढे आले. त्यांनी त्यांचा 32 वर्षाचा सेवे मध्ये अनेक सुख दुःखाचा सामना केला पण कधी दळमले नाही. त्यांचा प्रत्येक सुख दुःखात त्यांचा पत्नी सौ. प्रिती पाटील मॅडम या स्वतः प्राथमिक शिक्षक असुन त्यांनी साथ दिली. वेळ प्रसंगी त्यांनी मैलो प्रवास करुन 2 मुलांची जबादारी स्वीकारली. सरांची नोकरीं संस्थेत असल्याणी कोणत्याही एका ठिकाणी रहाणे शक्य नव्हते तरी त्यांनी संसार आणि आपले कुटुंब सांभाळून सर्व प्रकारे आपले किटुंब सांभाळून जबाबदारी स्वीकारली. बिपीन पाटील सर हे एक स्वछंदी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सर्व आप्तेष्ट, मित्र परिवार यांनी त्यांचा विषयी आपले मनोगत व्यक्त करुन त्यांचा आठवणी जाग्या केल्या. त्यांचा प्रभारी मुख्याध्यापक  एक वर्षाचा कालावधीत त्यांनी आपल्या सेवकांना कधीही त्रास दिला नाही सगळ्यांचा समस्या समजून अडीअडचणी समजून घेतल्या, या विषयी शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रवीण भाई कुंभार यांनी सांगितले त्याच बरोबर शाळेला योग्य वेळी मार्ग दर्शन केले. आणि संस्थेला विश्वासात घेऊन निर्णय घेतले. पाटील सर प्रभावी नेतृत्व होते. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून शाळेचा, संस्थेचा नियम सांभाळून प्रशासन सांभाळेल. विविध मान्यवर, मित्र मंडळी,, आप्तेष्ठ, शिक्षककर्मचारी वृंद यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या प्रसंगी मित्रमंडळी, आपतेस्ट, नातेवाहिक, सर्व अलिबाग कर, शाळेचे चेअरमन ऍड प्रवीण भाई कुंभार, उद्योजक सतीश देसाई, सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघोस्कर, केतन देसाई, रुपेश जाधव, केंद्र प्रमुख हाके साहेब, मुख्याध्यापक भुसे सर, शेख सर, उदयजी धुमाळ, शुभम वाघोस्कर, बबन बोरिटकर शैलेश गुप्ता इत्यादी मान्यवर व आमंत्रित मान्यवर मित्र परिवार उपस्तिथ होता. संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन आदरणीय संतोष भालेराव सर यांनी केले. आभार प्रदर्शन भावी मुख्याध्यापक दिनांक 1  फेब्रुवारी पासून असलेले आदरणीय श्री. अशोक अहिरे सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत