दि प्राईड इंडिया व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअर यांच्या वतीने ‘संस्कृती संगम’ कार्यक्रम संपन्न
सुधागड (राम तुपे ):
सुधागड तालुक्यातील चेरफळवाडी येथे दि प्राईड इंडिया व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअर यांच्या शाश्वत ग्राम प्रकल्पांतर्गत ‘संस्कृती संगम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
ग्रामीण भागातील संस्कृतीचे जतन व्हावे तसेच गावातील महिला, मुले, युवक व युवती यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. शाश्वत ग्राम प्रकल्पातील नंबरवाडी, उंबरवाडी व चेरफळवाडी येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कला सादर केल्या.
कार्यक्रमात ढोलकी, घुंगराच्या तालावर तलवार पारंपरिक नृत्य, फेर धरून नृत्य अशा विविध पारंपरिक कलांचा देखणा आविष्कार पहावयास मिळाला. लहानथोर मंडळींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये विचारांचे आदानप्रदान झाले तसेच प्रकल्पाच्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेच्या मानद संचालिका श्रीम. ईशादिदी मेहरा, कोकण विभागीय व्यवस्थापक डॉ. विरेंद्र कुलकर्णी, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री. वसंत मोरे यांनी केले. प्रकल्प समन्वयक श्री. धामणस्कर यांच्या नियोजनाखाली कार्यकर्ते स्नेहा खामकर, वेदश्री पाचपांडे, सुभाष धानिवले, शाळेचे शिक्षक श्री. राजेश काळे, श्री. इंदुलकर, श्री. बांगारे तसेच ग्रामस्थ रूपेश हंबीर, जानू हंबीर, दामा निरगुडे, रवींद्र हंबीर, श्रीम. दीपिका पिंगळा, पार्वती वारगुडे, ललिता वारगुडे, लक्ष्मी वारगुडे, नामदेव वारगुडे, लिंबाजी हंबीर, दिनेश वारगुडे, सुरेश हंबीर व चंद्रकांत वारगुडे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
नंबरवाडी, उंबरवाडी व चेरफळवाडी येथील महिला, युवक-युवती व लहानग्यांनी आनंदाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक प्रतिनिधी दिपक पारधी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत