HEADLINE

Breaking News

*टाटा स्टील युनियन अध्यक्ष नागेश मेहतर यांच्या घरी गणेशोत्सव उत्साहात; गणरायाच्या दर्शनाला सरपंच संतोष बैलमारे, प्लांट हेड शशिभूषण सर यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित*





खालापूर │ जतिन मोरे:- खालापूर तालुक्यातील सावरोली गाव गणेशभक्तीने उजळून निघाले आहे. टाटा स्टील कंपनीच्या युनियनचे अध्यक्ष नागेश मेहतर यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात करण्यात आले. बाप्पाच्या आगमनाने घरात आणि परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी गणेशदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सावरोली गावचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे उपस्थित राहिले. तसेच टाटा स्टील कंपनी (सावरोली) चे प्लांट हेड शशिभूषण सर, सौरभ शर्मा, मुकेश तिवारी, आशिष साळुंखे, प्रसाद मुंडे, अलोक बेहरा यांसह कंपनीतील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बाप्पाच्या दर्शनासाठी हजर होते. यावेळी भक्तिमय वातावरणात सर्वांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले. या आनंदाच्या प्रसंगी सर्व उपस्थितांनी एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला असून गणेशोत्सव केवळ धार्मिक सण नसून सामाजिक बंध मजबूत करणारा देखील महत्त्वपूर्ण उत्सव असल्याचे दाखवून दिले आहे. भक्तिभाव आणि सहकार्याच्या माध्यमातून गावातील लोक आणि कंपनीचे कर्मचारी एकत्र येऊन समाजासाठी सकारात्मक उदाहरण निर्माण करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत