रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
“रक्तदान हेच खरे जीवनदान” या सामाजिक भावनेतून उपक्रम : ५ ऑक्टोबर रोजी गोरेगाव (प) येथे शिबिर
वावोशी/जतिन मोरे: निस्वार्थी समाजसेवेचे व्रत घेऊन विविध उपक्रम राबवणाऱ्या रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि.) तर्फे यावर्षीही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत आय. बी. पटेल शाळा, स्टेशन रोड, गुरुवार बाजार, गोरेगाव (प), गोरेगाव स्टेशनलगत येथे पार पडणार आहे. मानवी जीवनात रक्ताचे महत्त्व अनमोल असून, "रक्तदान हेच खरे जीवनदान" या सामाजिक संदेशातून प्रतिष्ठान दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करते. यंदाही समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून, नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करतील, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदाता म्हणून जीवन वाचविणाऱ्या या कार्यात योगदान द्यावे असे आवाहन देखील रायगड मी मराठी प्रतिष्ठानने समाजातील सर्व नागरिकांना केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत