मृत्यू नंतरही सोसाव्या लागतात नरक यातना, स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; धो धो पडणाऱ्या पाण्यात आजही करावे लागतात अंत्यसंस्कार
पाली: ता. २५ जुलै (राहूल गायकवाड) सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत मधील बौद्धवाडी स्मशानभूमीला सन २०१८/१९ या वर्षी १४ व्या वित्त आयोगाच्या फंडातून एकूण अंदाजीत रक्कम १,७२०००/- रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना आजही त्या स्मशान भूमीवर शेड उभा राहिलेला नाही ही शोकांतिका असून शासानासठी लाजिरवाणी बाब आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे २५ तारखेला चंदरगावं येथील दिवंगत सटवाजि यादव यांचं निधन झाले. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न मृताच्या नातेवाईकांना पडला होता. पाऊसही कमी होत नसल्यामुळे स्मशानात मृतदेह ठेवून वर छत्र्यांचा आधार घेत सरनावर लाकडे ठेवावी लागली. अशी प्रेताची अवहेलना किती वेळ करायची असा प्रश्न नागरिकांना पडला होता. स्मशानभूमीत शेड आणि अन्य सुविधांआभावी अंत्यविधीसाठी होणारी परवड पाहता मृत्यू नतंरही सुटका नाही असेच म्हणावे लागेल. चंदरगाव बौद्धवाडीतील स्मशानभूमीवर पत्र्याचे शेड नसल्यामुळे भरपावासात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. परंतु याकडे ग्रामपंचायत चे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत