HEADLINE

Breaking News

मणिपूर येथील अमानवी घटनेचा वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने निषेध आंदोलन.


 मणिपूर येथील अमानवी घटनेचा वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने निषेध आंदोलन.


खोपोली: गेल्या काही दिवसात सोशियल मीडियाच्या माध्यमातून मणिपूर येथील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं असताना दिसत असून याची पार्श्वभूमी पाहता सदर व्हिडिओ 70-80 दिवसापूर्वीचा असून यामध्ये महिलांबरोबर अतिशय निर्घृण कृत्य करणारी आणि मानवतेला काळिंबा फासेल अशी असून यामध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण भारतभर संताप व्यक्त होत असताना वंचित बहुजन आघाडी खोपोली शहराच्या वतीने या घटनेविरोधात आक्रमक भूमिका घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निषेध आंदोलन करून घटनेचा तसेच इतक्या क्रूर घटनेकडे कान्हाडोळा करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि मणिपूर सरकारच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकाला आणि मणिपूर सरकारला लवकरात लवकर यावर उपाययोजना करून आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्याचे निवेदन मा.गृहमंत्री भारत सरकार यांना खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.शीतल राऊत साहेब यांच्या मार्फत देण्यात आले. सदर निषेध आंदोलन शहर अध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, महासचिव आशिष मणेर, कोषाध्यक्ष सुमित जाधव, संघटक संतोष मर्चंडे, उपाध्यक्ष रोहित वाघमारे, उपाध्यक्ष अखिल शेख प्रसिद्धी प्रमुख कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी भा.बौ.म.स.शहर अध्यक्ष रवींद्र सोनवणे, उत्तम पवार, ज्ञानेश्वर गायकवाड,अरुण सदाफुले, प्रकाश गायकवाड, संदीप मोरे, भगवान खंडागळे, सुनील पवार, विठ्ठल पवार, गणपत वाणी, संदीप वाघमारे, रमेश गायकवाड, हरी कांबळे, सिद्धार्थ सोनकांबळे,दिपक खाडे, अमोल गोरी, नयन गायकवाड,रतन जाधव, गणेश बनसोडे,राजेश गायकवाड,राहुल वाघमारे,अभि ओव्हाळ, नयनेश गायकवाड, रोहन गायकवाड, संकेत घायवट, भारत यादव,आजेश आगवणे,गणेश वाघमारे, कांबळे गुरुजी, जेपी सोनवणे गुरुजी,पंकज मोरे, किरण शिंदे, विलास वाघमारे, आर्यन बिऱ्हाडे, स्वप्नील गाडे,केरू सोनावणे, दिगंबर वाघमारे, मिताली वाघमारे, सुनीता घोडके, ऍड.अंजली गायकवाड, अपर्णा आगवणे, अश्विनी गायकवाड, प्रशाली मोरे,वर्षा मोहिते,ज्योती खाडे,कल्याणी गायकवाड, शुभांगी वाघमारे, विद्या गाडे, भारती गाडे यांच्यासह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत